अनावश्यक खर्च टाळून सतिश महिंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
महेश देशमुख (कुर्डूवाडी )
आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा हार,फुले,केक न आणता त्याऐवजी वह्या,पेन असे शैक्षणिक साहित्य आणण्याचे आवाहन कुर्डूवाडी ता.माढा येथील शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सतीश महिंगडे यांनी आपल्या वाढदिनी केले होते. वाढदिवसानिमित्त भेट मिळालेल्या वह्या,पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे कुर्डूवाडी नगरपालिका शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार,ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक सुनंदा रणदिवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.न.पा.च्या प्रा.शाळा क्र.१ ते ५ व उर्दू शाळे मधील एकूण १०० विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संचाचे वाटप करण्यात आले.सुरूवातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थित सर्वांना प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. .
यावेळी बोलताना ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक सुनंदा रणदिवे यांनी सांगितले की, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सतिश महिंगडे यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाचा जो उपक्रम राबविला आहे, तो अनुकरणीय आहे.यावेळी शिवस्वरूप महिंगडे,सुरज पवार,डॉ. मोहसीन मकणू,गणेश नलावडे,सतिश महिंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. .
यावेळी भारतीय जनता पक्षाचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष शंकर बागल,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड,कॉंग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान,हमिद शिकलकर,वलीमहमंद मुलाणी,मनोज धायगुडे,वसिम मुलाणी,मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शहानवाज शेख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सुहास टोणपे,अखिल भारतीय सेना तालुकाध्यक्ष गणेश नलावडे,शेर-ए- म्हैसूर टिपू सुलतान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहसीन मकणू,वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष महादेव साबळे,मनसे तालुकाध्यक्ष सागर लोकरे,विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष युवराज कोळी,शिवसेना उपप्रमुख (शिंदे गट) किशोर ढवळे,विक्रमसिंह परबत,मराठा सेवा संघ ता.उपाध्यक्ष अरूण जगताप,भक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ भराटे,ओमराजे संस्थेचे संदीप भराटे,मेजर नितीन कोळी,रियाज शेख,रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुरज काळे,रफिक खान,केतन राऊत,अरबाज पठाण,हाजू शेख,सागर कोळी,रफिक सय्यद,आदीसह सर्व राजकिय पक्षीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा