Breaking

मंगळवार, ११ जुलै, २०२३

अजित दादांची पावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले व दालनाचे तातडीने वाटप!



अजित दादांची पावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले व दालनाचे तातडीने वाटप!


मुंबई (मिलिंद माने). राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होण्याअगोदर राष्ट्रवादीच्या नऊ बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री पद व मंत्रिपद प्राप्त केल्यानंतर पवारांची पावर काय असते याची झलक आठच दिवसात राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना व आमदारांना पहावयास मिळाली आहे

 . राज्यातील शिंदे व फडणवीस व पवार या पक्षातील आमदारांचा मंत्रिमंडळा मध्ये समावेश होऊन पुन्हा एकदा विस्तार होण्याआधीच अजित पवारांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मंत्र्यांची दालने व बंगल्यांचे वाटप केले आहे

राज्य मंत्रिमंडळ नव्याने मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आज मंत्रालयात दालन वाटप व बंगल्यांचे वाटप करण्यात आले त्यांची नावे पुढीलप्रमाणे
छगन भुजबळ मंत्री मंत्रालय मुख्य इमारत दुसरा मजला दालन क्रमांक 201 दक्षिण बाजू (निवासस्थान ब सहा सिद्धगड)
हसन मिया लाल मुश्रीफ मंत्रालय विस्तार इमारत चौथा मजला दालन क्रमांक 407 (निवासस्थान क आठ विशालगड)
दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील मंत्रालय मुख्य इमारत तिसरा मजला दालन क्रमांक 303 उत्तर बाजू (निवासस्थान क एक सुवर्ण गड)
धनंजय पंडितराव मुंडे मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला दालन क्रमांक 201 ते 204 212 (निवासस्थान क सहा प्रचित गड)
धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम मंत्रालय विस्तारित इमारत सहावा मजला दालन क्रमांक 601 602 व 604 (निवासस्थान सुरुची तीन)
अनिल भाईदास पाटील मंत्रालय मुख्य इमारत चौथा मजला दालन क्रमांक 401 दक्षिण बाजू (निवासस्थान सुरुची आठ)
संजय बाबुराव बनसोडे मंत्रालय मुख्य इमारत तिसरा मजला दालन क्रमांक 301 दक्षिण बाजू (निवासस्थान सुरुची 18)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीपासून विरोधी पक्ष नेते पदाचा बंगला असल्याने त्यांना निवासस्थान वाटप झाली नाही तसेच राष्ट्रवादीचे नेते व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती सुनील तटकरे यांना मंत्रालयातील दालन व निवासस्थान याचे वाटप झाले नाही त्यामुळे रायगड जिल्ह्यात याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत

राज्य मंत्रिमंडळातील चार दिवसापूर्वी मंत्री घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दालन व निवासस्थानाचे वाटप करण्याचे काम अजित दादांच्या पावर मुळे झाले असल्याने भविष्यात अजित दादांची पावर मंत्रिमंडळात चालेल यात मात्र शंका नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा