नितेश राणे वर गुन्हा दाखल करण्याची महाड मधील शिवसैनिकांची मागणी !
महाड प्रतिनिधी मिलिंद माने , AJ24Taas News Maharashtra
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायम बेताल वक्तव्य व फोटोचे विद्रूपीकरण करून त्याचे सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाड मधील शिवसैनिकांनी करून त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा निषेध केला
केंद्रीय सूक्ष्म व लघु मंत्री नारायण तातू राणे यांचे पुत्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा आमदार नितेश नारायण राणे हे मागील काही दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्य करून त्यांच्या फोटोचे विद्रूपीकरण करण्याचे काम सोशल मीडिया द्वारे करून त्यांची नाहक बदनामी करीत असल्याचा निषेधार्थ महाड मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा निषेध व्यक्त केला
भाजपा आमदार नितेश राणे हे राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम करीत असून व शिवसैनिकांना भडकवून राज्यात अशांतता कशी माजेल हा त्यांचा प्रयत्न असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाड शिवसेना शहर प्रमुख चेतन पोटफोडे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे
या आंदोलनाच्या कार्यक्रमात वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे, महाड शहर संपर्कप्रमुख विजय तांबट, मंगेश देवरुखकर ,मोहन बेल, उपशहर प्रमुख प्रफुल धोंडगे ,युवा सेना तालुका अधिकारी दिलीप दांडेकर, राज देशमुख ,ममता शिंदे, अविनाश चौधरी ,साहिल हेलेकर, उमेश जगताप ,अमित गोगावले ,नाना पितळे, नथुराम दिवेकर ,आशिष नगरकर ,व महेंद्र जोगळे इत्यादी शिवसैनिक या निषेध कार्यक्रमास उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा