टेंभूर्णी उपजिल्हा रूग्णालयासाठी भुसंपादनाची रक्कम भरणा करणेस शासनाची मंजूरी- आ.बबनराव शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी। मुकुंद रामदासी यास कडून AJ 24 Taas News Maharashtra
माढा मतदारसंघातील मौजे टेंभूर्णी येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी जमीन भुसंपादनासाठी रू.1 कोटी 43 लाख 80 हजार 821 जलसंपदा विभागाकडे भरणा करणेस पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान ग्रामविकास मंत्री ना.गिरिष महाजन यांनी मंजूरी दिली असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की माढा मतदारसंघातील मौजे टेँभूर्णी हे मोठ्या लोकसंख्खचे गाव आहे. तसेच टेंभूर्णी हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून या ठिकाणी एम.आय.डी.सी. कार्यान्वीत आहे. तसेच परिसरातील अनेक गावांचा टेंभूर्णी या गावाशी मोठा संपर्क आहे. सध्या टेंभूर्णी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत आहे. टेंभूर्णी व परिसरातील गावांतील लोकसंख्खेचा विचार करता नागरिक व अपघातग्रस्तांना प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत वैद्यकिय सुख-सुविधा पुरविण्यास अनेक अडचणी येत आहेत. परिसरातील नागरिकांना व राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकिय सेवा उपलब्ध होणे गरजेचे असल्याने टेंभूर्णी येथे 50 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय होणेसाठी आ.बबनराव शिंदे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू होता. या 50 खाटांचे उपजिल्हा रूग्णालयासाठी शासनाने विशेष खास बाब म्हणून मंजूरी दिलेली आहे.
परंतु उपजिल्हा रूग्णालयाचे बांधकाम करणेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे मौजे टेंभूर्णी येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (जलसंपदा विभाग) यांचेकडील गट नं.866 मधील 1.60 हेक्टर जागा उपजिल्हा रूग्णालयासाठी शासनाने मंजूर केलेली आहे. या जागेचे शासकीय मुल्याकंन रू.1 कोटी 43 लाख 80 हजार 821 एवढे असून ही रक्कम उपजिल्हा रूग्णालयाचे भुसंपादनासाठी जलसंपदा विभागाकडे भरणा करणेस पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान ग्रामविकास मंत्री ना.गिरिष महाजन यांनी मंजूरी दिली असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा