Breaking

रविवार, २ जुलै, २०२३

गणपती फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न*


*गणपती फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न*


अकोले (खु) ता. माढा. येथील श्री गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली. या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते शुभम मगर उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुलाखत कौशल्य,संभाषण कौशल्य, वेळेचे महत्त्व व नियोजन, तणावमुक्त जीवनशैली, आत्मविश्वास, नेतृत्व कौशल्य इ. आत्मसात करण्याचा मूलमंत्र दिला. तसेच पदवीनंतर व्यवसायाच्या विविध संधी व व्याप्ती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. या व्याख्यानाचे समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे यांनी काम केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष श्री. बाबा येडगे, संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. आर. बेंदगुडे, तसेच प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा. प्रज्वला खपाले, प्रा. प्रियांका खडसरे, प्रा. रेणुका शिंदे, प्रा. कोमल साळुंखे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा