Breaking

सोमवार, ३ जुलै, २०२३

लोक कल्याण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नारा , "शिक्षणाची वारी पोचवू घरो घरी'



लोक कल्याण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नारा , "शिक्षणाची वारी पोचवू घरो घरी'



टेंभुर्णी:-  'शिक्षणाची वारी पोहोचू घरोघरी अशा घोषणा देत'!     लोक कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल कंदर तालुका करमाळा येथील विद्यार्थ्यांनी वेगळा संदेश देत दिंडी सोहळा उत्साहात पार पाडला या निमित्ताने मोफत  रुग्णांची तपासणी करण्यात आली

प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरला जातात मुलांमधेही भक्ती भावाचे वातावरण निर्माण व्हावे, भक्ती व शिक्षणाची शक्ती, याचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी लोक कल्याण इंग्लिश स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांची पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कीर्तीराज साळुंखे व स्वरांजली माने  या चिमुकल्यानी विठ्ठल, रुक्मिणीची हुबेहुब  वेशभूषा सादर केलती  इतर विद्यार्थ्यांनी ही हातामध्ये फलक घेऊन 'शिक्षणाचे वारी पोचू घरोघरी, मुली वाचवा मुली शिकवा, आधी विविध प्रकारच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर दणाणून सोडला. या दिंडी सोहळ्याचे स्वागत प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी मोफत गुढगे ,मन ,मानका, याचा त्रास असणाऱ्या रुग्णाची तपासणी करण्यात आली 
त्याच प्रमाणे महिला पालक व विध्यार्थी फुगडी ,लंगडी आदी खेळत रंगून  गेलते
यावेळी शाळेच्या वतीने या चिमुकल्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

यावेळी शाळेचे संवस्थापक आबासाहेब साळुंके, धनाजी शिंदे, महादेव माने, गणेश माने, त्रिंबक माने जयश्री माने, रोहिणी माने ,सुवर्णा माने, पांडुरंग बदक ,विमल बदक, बिभीषण गाडेकर, जयश्री शिंदे, नितीन जाधव, मालन जाधव,  आदी उपस्तीत होते हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा साळुंके, सचिव रोहिणी साळुंके , शिक्षिका इरमंजून जहागीरदार, मनीषा शिंदे, जहागीरदार, आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा