भिमानगर चौकातील रस्ता ( मिडियन) दुभाजक लवकरात लवकर चालू करावे मा.सभापती संजय पाटील भिमानगरकर
अन्यथा आंदोलन करण्यात येईल
भिमानगर प्रतिनिधी
प्रदीप पाटील
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांनी 25 जुलै रोजी भिमानगर येथील मिडीयन ओपनिंग पोलीस बाळाचा वापर करून स्थानिक प्रशासनाला व ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता रस्ता दुभाजक बंद केला आहे.भिमानगर येथे हायस्कूल असून या गावात मुले व मुली शिक्षणासाठी इतर गावातून येतात येत असतात तसेच भीमानगर येथे डीसीसी बँक व बँक ऑफ इंडिया असून त्या ठिकाणी त्या भागातील दहा ते पंधरा गावातील शेतकऱ्यांचा भीमानगर बँकेत येणे जाणे असते तसेच भिमानगर येथे उजनी धरण असून त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांचे ऑफिस असून मोठी वसाहत आहे त्यामुळे तेथील मिडीयम बंद करू नये म्हणून आम्ही ग्रामपंचायत ने ठराव घेऊन वारंवार कळविले असताना आज भिमानगर येथे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे.
भिमानगर चौक येथे वारंवार एक्सीडेंट होतात म्हणून आम्ही प्रकल्प संचालक यांना वारंवार कळवून सुद्धा त्यांनी कोणतेही एक्सीडेंट बाबत उपाययोजना केलेली नव्हती त्यावेळेस आम्ही रस्ता रोको आंदोलन करून त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर व सूचनाफलक लावण्याबाबत आंदोलन केले होते भिमानगर येथे अपघात होण्यास प्रकल्प संचालक जबाबदार असून त्यांनी कोणतीही त्यावर उपाययोजना केली नव्हती भिमानगर येथे अपघात होण्याचे कारण म्हणजे आढेगाव पाटी पासून भिमानगर पर्यंत पूर्णपणे उतार असून सोलापूरकडून येणारी वाहने अतिशय वेगाने येतात त्यामुळे तेथे अपघात होतात आम्ही वारंवार प्रकल्प संचालकास याबाबत कळविले होते की मिडियनच्या पाठीमागे 200 मीटर वर स्पीड ब्रेकर करून रस्त्यावर पांढरी पट्टी मारून सूचना फलक लावावेत म्हणून विनंती केली होती त्याबाबत भिमानगर येथे मोठी रस्ता रोको आंदोलने झाली होती.
ग्रामपंचायत ने ठराव घेऊन प्रकल्प संचालक यांना कळविले होते परंतु त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही त्यामुळे या अपघातात निरापराद लोकांना जीव गमावावा लागलेला आहे. भिमानगर येथे मिडीयनच्या पाठीमागे 100 मीटर स्पिड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग करून सूचना फलक लावली असते तर अपघात झाले नसते परंतु प्रकल्प संचालकांच्या दुष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत पुणे सोलापूर हवेवर छोट्या छोट्या गावांना मिडियन असून त्या ठिकाणी रस्त्यामधील दुभाजक हा छोटा करून मिडीयन केलेले आहेत परंतु भिमानगर सारख्या मोठ्या गावात मिडीयन छोटा न केल्यामुळे व झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर न केल्यामुळे त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत हे अपघात मिडीयनमुळे झाले नसून प्रकल्प संचालक यांच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत.
भीमानगर येथील मिडीयन तयार करून त्या ठिकाणी विभाजक लहान करून मिडियनच्या पाठीमागे शंभर मिटरवर झेब्रा क्रॉसिंग केले असते तर एक्सीडेंट झाली नसते व नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नसती.
तरी लवकरात लवकर ( मिडियन ) रस्ता दुभाजक लवकर चालू करावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असे मा कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा