Breaking

बुधवार, २६ जुलै, २०२३

घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान द्यावे ... गावठाण विस्तारासाठी गायरान जमिनी उपलब्ध व्हाव्यात .. आमदार बबनदादा शिंदे यांची विधानसभेत मागणी .....ग्रामीण विकास मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर



घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान द्यावे ... गावठाण विस्तारासाठी गायरान जमिनी उपलब्ध व्हाव्यात  .. आमदार बबनदादा शिंदे यांची विधानसभेत मागणी .....ग्रामीण विकास मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर 


बेंबळे ।प्रतिनिधी.............

                    ग्रामीण भागातील  लाभार्थीनागरीकास घरकुलासाठी दहा वर्षांपूर्वी पन्नास हजार रुपयांची रक्कम दिली जात होती परंतु सध्याची परिस्थिती पाहता पन्नास हजार रुपयांमध्ये कोणतीही गोष्ट होत नसल्याने जमिनीची खरेदी देखील होत नाही. त्यामुळे शासनाने घरकुलासाठीचे अनुदान पन्नास हजार रुपयांऐवजी एक लाख रुपये करण्यात यावे, जेणेकरून एक गुंठा जमीन घरकुलासाठी घेता येईल. ज्या वन विभाग, गायरान शासकीय जमिनी आहेत  त्यांचे अधिकार तहसीलदार, प्रांत यांना देण्यात यावे, जिल्हाधिकारी पातळीवर अधिकार असल्याने घरकुल बांधण्यासाठी त्याचबरोबर मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.माढा तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील सुमारे 200 घरकुल मंजूर आहेत., परंतु या घरकुलांसाठी जागा उपलब्ध नाही ,त्यामुळे खऱ्या अर्थाने लाभार्थीना जागा उपलब्ध करून देण्यापेक्षा गावाच्या शेजारी गावठाण विस्तार करण्याच्या दृष्टीने गायरान जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात, जेणेकरून हा कायमचा प्रश्न सुटेल. घरकुल मंजूर होऊन जागा नसलेल्या व्यक्तींना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार बबन दादा शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचने द्वारे केली केली.

         या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन म्हणाले की  ही वस्तुस्थिती असून जागेचे भाव नक्कीच वाढलेले असून आजच्या बैठकीत हा विषय घेण्यात येईल. कॅबिनेट बैठकीमध्ये यावर निर्णय घेतला जाईल. घरकुलाबाबत मल्टी स्टोअर अर्थात तीन मजली इमारत करण्याच्या दृष्टीने ही योजना राबवता येऊ शकते का? जेणेकरून शासनाचे जागेचे पैसे वाचतील या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करेल.
मंत्री महोदय पुढे म्हणाले की ग्रामीण भागात लोकसंख्या वाढल्यामुळे जागेची आवश्यकता आहे, गावचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून त्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. गायरान जमिन गावाच्या विस्तारीकरणासाठी घेता येते का? याबाबत कार्यवाही करण्यात येईल , याबाबतच्या सूचना शासन स्तरावर दिल्या आहेत, असे उत्तर मंत्री महोदयांनी दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा