राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदशनाखाली लोककल्याण शासकीय कार्यालय यांच्यावतीने कुसमोड येथे रेशनकार्ड व विविध दाखल्यांचे शिबीर
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस- माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदशनाखाली लोककल्याण शासकीय कार्यालय माळशिरस पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य व कुसमोडचे सरपंच पुरुषोत्तम धायगुडे यांच्या सहकार्यातुन कुसमोड येथे ग्रामपंचायत कार्यालयात भव्य रेशनकार्ड शिबीर व विविध दाखल्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.या कम्पमध्ये ६६ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला .सदर कॅम्पवेळी युवा नेते जिवनराव जानकर, कुसमोडचे सरपंच पुरुषोत्तम धायगुडे, माजी सरपंच तुषार लवटे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे, माजी उपसरपंच संजय पाटील, माजी उपसरपंच रणजित पाटील, तलाठी महेश गायकवाड, ग्रामसेवक नवले,गोपाळ माळी,सुभाष जाधव,दगडु पाटील, संदीप कबाडे,उमाजी बोडरे,तानाजी लेंगरे,भाऊसाहेब बोडरे,देवानंद चव्हाण, मारुती वाघ, उपस्थित होते .तर सदर कॅम्पवेळी नागेश सकट,विकी भिसे,गणेश नामदास,सोनु बनसोडे, रोहीत धांईजे, प्रमोद मिसाळ यांनी विशेष परीश्रम घेत दाखले व आवश्यक कागदपत्रे यासाठी ग्रामस्थांना विशेष सहकार्य केले.
फोटो - कुसमोड येथे आयोजित कॅम्प प्रसंगी सरपंच पुरुषोत्तम धायगुडे, माजी सरपंच तुषार लवटे, संजय पाटील, ग्रामसेवक नवले,तलाठी गायकवाड व इतर मान्यवर .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा