माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी कुसमोड येथील रस्तयाला निधी उपलब्ध करुन देणयाची ग्रामस्थांनची मागणी
aj24taas News Maharashtraसाठी पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस -
माळशिरस तालुक्यातील कुसमोड गावातील रस्तयाची अवस्था खरेतर अदयापही अतिशय दयणीय आहे. पंढरपूर - सातारा रस्त्यापासुन कुसमोड गावात येणारा एक डांबरीकरण झालेला रस्ता आहे सध्या तो अतिशय खराब झाला आहे. तर गारवाड - चांदापुरी - कुसमोड - मळोली ( प्रमुख जिल्हा मार्ग - २१७) म्हणजेच या अगोदरचा इतर जिल्हा मार्ग ७० हा रस्ता खरे तर कोळेगाव, काळमवाडी, फळवणी,साळमुखवाडी, कुसमोड येथील नागरिक ,विदयार्थी यांना माळशिरस, अकलुज, पुणे,शिंगणापूर या ठिकाणी जाणयासाठी अतिशय सोईस्कर तसेच जवळचा मार्ग आहे. मात्र कुसमोड गावापासून चांदापुरी चौकाकडे जाणाऱ्या रस्तयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्तावर गुडघ्या एवढे खडडे आहेत त्यात पावसाळयात पाणी साचुन राहते तसेच प्रचंड चिखल होतो .यामुळे या रस्तयाने नागरिकांना ,विदयार्थीना ये जा करणे मुश्किल झाले आहे. तसा हा अतिशय महत्वाचा आणी मुख्य रस्ता पण अनेक वेळा प्रशासनाकडे ,लोकप्रतिनिधी कडे मागणी करुनही रस्ताची मागणी मान्य झालीच नाही. निमगाव गटाच्या जि प सदस्य ज्योतीताई पाटील यांच्या फंडातुन अर्ध्या किलोमीटर च्या आसपास रस्ता डांबरीकरण झालेला आहे. इतर तिन ते चार किलोमीटर रस्ता अत्यंत खराब आहे. सदरच्या रस्ताचे डांबरीकरण माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी करुन दयावे अशी मागणी समस्त कुसमोड कर ग्रामस्थांनची आहे .हया रस्ताचे काम तेच करतील अशी मोठी अपेक्षा कुसमोडकर ग्रामस्थ ठेवुन आहेत . चौकट - याविषयी कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील यांना विचारले असता आपण हया रस्त्यासाठी लवकरच आमदार रामभाऊ सातपुते यांना ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्यांसह भेटणार असुन रस्त्याच्या कामासाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देणयासाठी आग्रह धरणार आहे. फोटो - चांदापुरी चौकातुन कुसमोड कडे जाणाऱ्या रस्तयाची झालेली दुरावस्था
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा