दहावी बोर्ड परीक्षेत पुनर्मुल्यांकनानंतर महात्मा फुले ची सृष्टी बागवाले महाराष्ट्रात प्रथम..।
.....सृष्टीला मिळाले शंभर टक्के गुण.....
बेंबळे ।प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी जीवन बागवाले ह्या विद्यार्थिनीला मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत पुनर्मूल्यांकनात शंभर टक्के गुण मिळाले असून, ती महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. या विद्यार्थिनीला आत्मविश्वास होता की, मला कमी गुण मिळणार नाहीत. तशा प्रकारचा अर्ज तिने शाळेच्या मुख्याध्यापकांना केला व त्यानुसार पुनर्मूल्यांकनामध्ये तिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत, यामुळे कुमारी सृष्टीने टेंभुर्णीच्या महात्मा फुले विद्यालयाचे नाव महाराष्ट्रभर केले आहे. याचप्रमाणे पुनर्मुल्यांकनामध्ये या विद्यालयाचे पाच विद्यार्थी गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम क्रमांकात आले आहेत, त्यामध्ये सृष्टी बागवाले, यश पागळे, भावेश खटके, पूजा साळुंखे व ऋतुजा पाटील यांचा समावेश आहे, तसेच विज्ञान विषयात दोन व इतिहास विषयात पाच विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक वर आले आहेत. टेक्निकल विषयात विद्यालयाचे 48 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण घेऊन प्रथम आले आहेत. टेंभुर्णी सारख्या निमशहरी गावात बहुसंख्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळून संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना उच्च श्रेणी प्राप्त होत असल्याबद्दल महात्मा फुले विद्यालयाचा नाव लौकिक सर्वत्र वाढत आहे. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, सरपंच प्रमोद कुटे, पंचायत समिती सदस्य वैभव कुटे, संस्थेचे संस्थापक नारायण भानवसे, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय यादव , उच्च प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शोएब बागवान , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विविध समित्यांचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेआहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा