Breaking

रविवार, ३० जुलै, २०२३

टेंभुर्णी चे माजी उप सरपंच पंढरीनाथ चव्हाण यांचे दुःख निधन*


*टेंभुर्णी चे माजी उपसरपंच पंढरीनाथ चव्हाण यांचे दुःख निधन*


टेंभुर्णी प्रतिनिधी. 

टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या चव्हाणवाडी (टें) ता. माढा येथील टेंभुर्णी ग्रामपंचायतचे माजी उप सरपंच पंढरीनाथ नारायण चव्हाण यांचे रविवारी मध्य रात्री साडेबारा वाजता वयाच्या 98 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे टेंभुर्णी सह चव्हाणवाडी व परिसरातील जनतेशी चांगले जवळचे संबंध होते. ते नाना या नावाने सर्वत्र परिचित होते.


 त्यांच्या निधनाने टेंभुर्णी  परिसरातील जनतेवर व चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला टेंभुर्णी ग्रामपंचायत पासून चव्हाणवाडी ( टें) विभक्त झाल्यानंतर चव्हाणवाडीच्या राजकारणामध्ये त्यांची वेगळी छाप होती अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते ते स्वतः चव्हाणवाडी ग्रामपंचायत मध्ये पार्टी प्रमुख होते. त्यांनी माढा तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायत मध्ये 1974 ते 1979 या कालावधीमध्ये उपसरपंच पद भूषवले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण  यांचे ते आजोबा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा