Breaking

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

राष्ट्रकल्याणासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या तरुणांचा आदर्श सर्व तरुण संघटनांनी घ्यावा....ए पीआय जोग ..



राष्ट्रकल्याणासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या तरुणांचा आदर्श सर्व तरुण संघटनांनी घ्यावा--- ए पीआय जोग  ..     

  
                                    टेंभुर्णी (प्रतिनिधी) दि २८. पृथ्वीवरून मनुष्य मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करत आहे त्यामुळे हवामानाचा समतोल बिघडून दुष्काळ अतिवृष्टी ढगफुटी यासारखी नैसर्गिक संकटे मानवावर कोसळत आहेत वृक्षतोडीमुळे दरड कोसळणे यासारखे प्रकार घडवून गावेच्या गावे बेचिराख होत आहेत आणि या सर्व संकटांना आपण मानव जबाबदार आहोत त्यामुळे जय मल्हार क्रांती संघटनेच्या तरुणांनी महा वृक्ष लागवड राबवून माढा तालुक्यातील अनेक गावांना हरित करण्याचे स्वप्न तरुणांना दाखवले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होऊन नैसर्गिक आणि सामाजिक समतोल राखला जाईल तरुणांचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे अंकुशराव जाधव सरकारी सुशिक्षित तरुण आपल्या तरुण बांधवांना सोबत घेऊन माढा तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचे काम करतोय हा एक समाजाला आदर्श आहे आणि हा आदर्श समाजातील इतर संघटनांनी व तरुणांनी घ्यावा असे उद्गार टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीष जोग यांनी काढले ते महा वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या टेंभुर्णी खंडोबा मंदिर येथील वृक्ष लागवड प्रसंगी बोलत होते यावेळी राजकुमार कोठारी रोटरी क्लबचे महेश कोठारे साप्ताहिक गावकूस चे संपादक विष्णू बिचकुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.   
    
  जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने माढा तालुक्यात महा वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात
दिनांक 27 /7/2023 टेंभुर्णी येथील श्री खंडोबा मंदिर अकलूज रोड नजीक मा दौलत नाना शितोळे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटना व उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटना मा अंकुशरावजी जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय  मा गिरीश जोग साहेब व पी एस आय कुलदीप सोनटक्के साहेब व टेंभुर्णी शहराचे नूतन रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश कोठारी यांच्या व सचिव रोटरी क्लब टेंभुर्णीचे तनवीर मुलानी व टेंभुर्णी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व उपसरपंच प्रतिनिधी शिवाजी गोंदिल व कॅन्सर फाउंडेशन अध्यक्ष योगेश भणगे व जय मल्हार क्रांती संघटनेचे माढा तालुक्यातील सर्व युवक व जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश माने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव, बहुजन वंचित आघाडीचे नेते राहुल गौतम चव्हाण तसेच टेंभुर्णीचे आरपीआयचे नेते रमेश नाना लोंढे व दत्ता चव्हाण पत्रकार बंधू विष्णू बिचकुले साहेब महेश कोकीळ पारस कटारिया बंडू रावळ शरद गुजले सिद्धेश्वर मदने मल्हारी गुजले लक्ष्मण मदने भाऊ मसुगडे दीपक माने अतुल पाटोळे  सचिन चव्हाण गणेश चव्हाण लक्ष्मण तात्या जाधव बापू बोडरे सतीश पाटोळे अमोल शिरतोडे अमोल शिरतोडे अमोल मदने यश गुजले गणेश शिरतोडे उमेश पाटोळे शंकर जाधव ओंकार मदने बाप्पा मदने धनंजय गुजले दत्ता मदने अक्षय मदने लहू गुजले बाळासाहेब गुजले दादा गुजले विपुल मदने साधू मदने रामभाऊ गुजले व कार्यक्रमास रोटरी क्लब ची सर्व कार्यकर्ते कॅन्सर फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते इनरव्हील क्लब ची सर्व महिला मंडळी तसेच उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात श्री खंडोबा देवाला उपाध्यक्ष श्री अंकुश जाधव सर, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश कोठारी व एपीआय गिरीश जोग साहेब  यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने व नूतन रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश कोठारी यांच्या उपस्थितीत व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय गिरीश जोग व सोनटक्के साहेब तसेच टेंभुर्णी शहरातील सर्व संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू विविध संघटनेचे कार्यकर्ते त्यांचा कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार सोहळा संपन्न झाला व अशाप्रकारे टेंभुर्णी शहरातील खंडोबा देवस्थान परिसरात अनेक प्रकारच्या पक्षांची जोपासणीचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेंभुर्णी शहराचे युवा नेते पैलवान अमोल भाऊ मदने यांनी केले व अशाप्रकारे टेंभुर्णी शहरांमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली व कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. सोहळ्याप्रसंगी झाडे वाचवा झाडे जगवा मुली वाचवा व व्यसनमुक्त टेंभुर्णी होण्यासाठी संघटनेच्या वतीने अंकुशराव जाधव सर यांनी दोन शब्द सर्व नागरिकांसमोर व्यक्त केले व अशाप्रकारे कार्यक्रम सोहळा संपन्न झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा