Breaking

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

औसा येथे तालुका क्रीडा संकुल उभारणार -आ. अभिमन्यू पवार.*


औसा येथे तालुका क्रीडा संकुल उभारणार -आ. अभिमन्यू पवार.


*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*      

   महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. परंतु औसा तालुक्यात अद्यापही तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे औसा तालुक्यातील खेळाडूंची मोठी  अडचण होत आहे. तसेच विविध तालूकास्तरीय स्पर्धा घेण्यास क्रीडा शिक्षकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी, तालुक्यातून क्रीडा पटू तयार होण्यासाठी व तालुक्यातील सर्व क्रीडा प्रेमीसाठी हे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे. यासाठी मा. क्रीडा अधिकारी लातूर. यांच्याकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्यापही क्रीडा संकुलाचा  प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे शिष्टमंडळ लातूर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे सदस्य श्री. शिवराम शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली औशाचेआमदार मा. श्री. अभिमन्यू पवार यांना भेटून प्रस्तावित औसा तालुका क्रीडा संकुल उभारणीबाबत निवेदन देऊन क्रीडा संकुल उभा करण्याची विनंती केली. त्यावर आमदार साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन येणाऱ्या काही दिवसातच औसा तालुका क्रीडा संकुल उभारणार असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिवराम शिंदे सर यांच्यासोबत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. कमलाकर सावंत, मुख्याध्यापक श्री. मलवाड सर, साहेबराव धुमाळ सर, रंगनाथ अंबुलगे सर,पत्रकार किशोर जाधव,सोमनाथ काजळे सर व तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*         महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. परंतु औसा तालुक्यात अद्यापही तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे औसा तालुक्यातील खेळाडूंची मोठी  अडचण होत आहे. तसेच विविध तालूकास्तरीय स्पर्धा घेण्यास क्रीडा शिक्षकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी, तालुक्यातून क्रीडा पटू तयार होण्यासाठी व तालुक्यातील सर्व क्रीडा प्रेमीसाठी हे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे. यासाठी मा. क्रीडा अधिकारी लातूर. यांच्याकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्यापही क्रीडा संकुलाचा  प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे शिष्टमंडळ लातूर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे सदस्य श्री. शिवराम शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली औशाचेआमदार मा. श्री. अभिमन्यू पवार यांना भेटून प्रस्तावित औसा तालुका क्रीडा संकुल उभारणीबाबत निवेदन देऊन क्रीडा संकुल उभा करण्याची विनंती केली. त्यावर आमदार साहेबांनी सकारात्मक चर्चा करुन येणाऱ्या काही दिवसातच औसा तालुका क्रीडा संकुल उभारणार असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिवराम शिंदे सर यांच्यासोबत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. कमलाकर सावंत, मुख्याध्यापक श्री. मलवाड सर, साहेबराव धुमाळ सर, रंगनाथ अंबुलगे सर,पत्रकार किशोर जाधव,सोमनाथ काजळे सर व तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा