Breaking

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

टेंभुर्णी येथील दिलीप पवार, दीपक पवार यांना मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिन मंजूर.



टेंभुर्णी येथील दिलीप पवार, दीपक पवार यांना मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिन मंजूर.



टेंभुर्णी प्रतिनिधी :-टेंभुर्णी येथील ब्राह्मण तळे येथे राहणारे हरिश्चंद्र उत्तम पवार (वय-३०) यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपीस डुक्कर का घेऊन चाललास असा जाब विचारल्यावर चिडुन दिलीप परमेश्वर पवार, दिपक परमेश्वर पवार, रामचंद्र परमेश्वर पवार, लखन परमेश्वर पवार,  विशाल नागनाथ पवार, योगेश ज्ञानेश्वर पवार, अनार्य उर्फ सुरज पवार (सर्व रा- टेंभुर्णी) यांनी फिर्यादी व त्याच्या भावांना बेकायदेशीर साथीदार जमावून शिवीगाळ करीत हाताने, लोखंडी सळईने व काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले अशी फिर्याद दिली.तद्नंतर १मार्च रोजी फिर्यादी हरिश्चंद्र उत्तम पवार व त्याच्या ३ भावांवर गंभीर मारहाण करून सव्वातीन तोळ्याची सोन्याची चैन काढुन घेतल्याची तक्रार सुरज पवार याने टेंभुर्णी पोलीसांत दाखल केली. या प्रकरणातील दोन्ही गटातील ४-४ जणांचा नियमित जामीन झाला होता. 
सदर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नामे दिलीप परमेश्वर पवार, दिपक परमेश्वर पवार आणि रामचंद्र परमेश्वर पवार याचा अटकपूर्व जामीन मे. बार्शी न्यायालयाने १२ जून २०२३ रोजी फेटाळण्यात आला. तद्नंतर आरोपी दिलीप परमेश्वर पवार व दिपक परमेश्वर पवार यांनी १ जुलै २०२३ रोजी ॲड. अजिंक्य संगीतराव यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला ४ जुलै २०२३ रोजी सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने  सशर्त अटींसह दोन्ही आरोपींचा रुपये २५०००/- इतक्या वैयक्तिक जातमुचकल्यावरती जामीन अर्ज मंजूर केला. याप्रकरणी आरोपींच्या वतीने ॲड. शैलेश चव्हाण व ॲड. अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा