विजय ग्रंथ महापारायण नियोजनासाठी रोपळे (क)येथे रविवारी बैठकीचे आयोजन.. ना.पा.कुलकर्णी
बेंबळे। प्रतिनिधी।
श्री संत गजानन भक्त परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे होणार्या गजानन महराजांच्या श्रीगजानन विजय ग्रंथाचे महापारायण नियोजनासाठी परिवाराचे मार्गदर्शक गमभःशशिकांत पोकळे दादा यांच्या उपस्थितीत आणि निमगाव टे. येथील अशोक बाळकृष्ण मराठे यांच्या अध्यक्षतेखाली रोपळे (क) ताःमाढा येथे रविवार दिनांक ९ जूलै रोजी सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती सचिव नाःपांःकुलकर्णी यांनी येथे दिली आहे.
या महान अध्यात्मिक कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत असा की ११ हजार वाचक भक्तांचे एकदिवसीय महापारायण पंढरपूर येथे ६५एकर क्षेत्रातील परिसरात रविवार दिनांक २८ जानेवारी 2024 रोजी होणार आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन कमिटीची नियोजनबद्ध जोमाने तयारी सुरू आहे .प्रत्येक तालुक्यातील संयोजक, प्रयत्नशील असून येणाऱ्या वाचक भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन शिस्तबद्ध करीत आहेत.
रोपळे क.। येथील मिटिंगमध्ये परिवाराचे मार्गदर्शक गमभःशशिकांत पोकळे दादा मार्गदर्शन करणार असल्यामुळे खूप मोठ्या संख्येने वाचक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन कमिटीचे प्रमुख प्रा.योगेश दळवे यांनी केले आहे ,त्यासाठी कुर्डूवाडी ते रोपळे येथे जाण्यायेण्यासाठी खास बसची व्यवस्था आणि महाप्रसादाचे नियोजनही श्री दळवे यांनी केले आहे. महापारायणाच्या नियोजनासाठी विविध कमिट्यांची योजना केली असून महिला भगिनिंचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे .कमिटीमध्ये गुरुलिंग कन्नुरकर, अशोक कुलकर्णी, स्वाती मसलेकर, विजय साळुंखे, सनातन पाटील, संजय उरणे, स्मिता यादव, वैशाली पैलवान, सुनिता नागणे, अतुल उकळे, प्रसाद भाकरे, मेघना वांगिकर, दिपक पंढरी, झाडबुके परिवार, लतिका साठे, अनघा बिराजदार, सुरेखा चौधरी, संजय गोखले, ज्ञानेश्वर चटे, दयानंद परिचारक, अनुराधा कुलकर्णी, पवार, प्रकाश कुलकर्णी, उदय होदाडे , निलकंठ देशमुख, दास,ढोले,चवरे,इत्यादी संयोजक कामाला लागले आहेत.शिस्त, स्वच्छता, प्रामाणिकपणा ठेवून सोलापूर जिल्ह्यातील पहिल्यांदाच होत असलेल्या या महापारायणाबाबत दरमहा मिटींग घेऊन नियोजन सुरू आहे अशी माहिती नियोजन कमिटीच्या वतीने जयसिंग गाडेपाटील यांनी येथे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा