पिलीव येथील अहील्यादेवी चौकातील रखडलेले रस्तयाचे काम ताबडतोब पुर्ण करावे अन्यथा १ ऑगस्ट रोजी भाजपतर्फे रस्ता रोको.
पिलीव प्रतिनिधी /प्रमोद भैस -
............AJ 24 Taas News Maharashtra...
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील राष्ट्रीय महामार्गावरील अहील्यादेवी चौकातील गेल्या चार वर्षापासुन रखडलेले म्हसवड - पंढरपूर महामार्ग क्रमांक इ ५४८ वरील पिलीव येथील अहील्यादेवी चौकातील - बचेरी चौकातील काम अपुर्ण आहे. यामुळे चौकात दळणवळणाची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळयात तर याठिकाणी प्रचंड घसरण होत आहे. इतर वेळी कारखाना सुरु झाला की प्रचंड धुळीचे साम्राज्य याठिकाणी पसरते तसेच अपघात होतात यामुळे गावातील तसेच बाहेरील प्रवाशी विदयार्थी यांना वाहतूकीच्या कोंडीमुळे प्रचंड त्रास होता.तसेच याठिकाणी चढ उतार असल्याने जलद येणारे वाहन जोरात आदळते .यामुळे वारंवार अपघात होत आहेत.यापुर्वी ग्रामपंचायतीने अनेका वेळा रस्ताचे काम पुर्ण करावे म्हणून पत्र व्यवहार केला मात्र याची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तसेच बचेरी चौकातील ओघळीवर पुल बांधण्याची ग्रामपंचायतीने मागणी केली आहे. याचीही दखल घेतली गेली नाही. सदर कंपनी व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे पिलीव शहर भाजपच्या वतीने १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत रस्ता रोको करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र करांडे यांनी सांगितले. याबाबत माढा मतदारसंघाचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ रामभाऊ सातपुते, विधानपरिषदचे आ रणजितसिंह मोहीते पाटील, प्रांताधिकारी अकलुज, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार माळशिरस, पोलीस निरीक्षक माळशिरस, यांना याविषयी रितसर निवेदने दिली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागिरदार, माजी जि प सदस्य गणेशदादा पाटील, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र करांडे, सुळेवाडी सोसायटीचे चेअरमन पांडुसिंग जनवर,माजी उपसरपंच संजय आर्वे, अविनाश जेऊरकर, रणधीरसिंग जामदार, मोहसीन शेख,समशेरसिंग रजपुत, पत्रकार रघुनाथ देवकर, दामोदर लोखंडे, संजय पाटील, प्रमोद भैस,सुजित सातपुते, विश्वजीत गोरड,गणेश देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थिती होते. फोटो - पिलीव येथील अहील्यादेवी चौकातील रखडलेले रस्ताचे काम ताबडतोब पुर्ण करावे अन्यथा १ ऑगस्ट रोजी रस्ता रोको करणार याचे निवेदन देताना संग्रामसिंह जहागिरदार, राजेंद्र करांडे, रघुनाथ देवकर, दामोदर लोखंडे, संजय पाटील व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा