Breaking

गुरुवार, २७ जुलै, २०२३

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ जुलै रोजी जन्मलेल्या बाळाच्या नावाने पाच हजार रुपयांची ठेव .



आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ जुलै रोजी जन्मलेल्या बाळाच्या नावाने पाच हजार रुपयांची ठेव



कन्हेरगांव दि प्रतिनिधी

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 31 जुलै रोजी कन्हेरगाव तालुका माढा येथे जन्मलेल्या बाळाच्या नावाने पाच हजार रुपयांची ठेव ठेवून आमदार संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे यांनी दिली.
          कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांच्या वतीने 5000 हजार रुपयांची 18 वर्षाची मुदत ठेव संजयमामा शिंदे ग्रामीण बिगर शेती पतसंस्था , कन्हेरगाव या संस्थेत ठेवली जाणार आहे तरी गावातील जन्मलेल्या बाळाच्या पालकांनी संपर्क करावा  असे आवाहन धनंजय मोरे , राजेंद्र केदार यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा