Breaking

गुरुवार, २७ जुलै, २०२३

सख्ख्या चुलत अल्पवयीन बहिणीचे अपहरण अत्याचार प्रकरणी भावास जामीन मंजूर....


सख्ख्या चुलत अल्पवयीन बहिणीचे अपहरण अत्याचार प्रकरणी भावास जामीन मंजूर....

            सख्ख्या अल्पवयीन चुलत बहिणीचे लग्नाच्या उद्देशाने अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याचे खटल्यातून आरोपीस अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहरबान जे.सी. जगदाळे साहेब बार्शी यांनी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला.

             यात थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक सात जून 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास कुमारी निर्भया ही तिचे पालकाचे घरी झोपले असता तिची आई पहाटे हिटरला पाणी तापवण्यास उठली असता निर्भया ही झोपलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. आई-वडिलांनी इतर ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. कुमारी निर्भया हीस कशाचे तरी आमीष दाखवून पळवून नेहले असले बाबत पालकांनी त्यांचा पुतण्या मंगेश पोपट काळे याचे विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात प्रथम अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
              पुढे पोलीस तपास दरम्यान कुमारी निर्भया व आरोपी या दोघांना दिनांक 12 जुन 2023 रोजी पोलिसांनी गोंदिया येथून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी कुमारी निर्भयाचे जबाब नोंद करून गुन्ह्यात आणखी लग्नाचे उद्देशाने अपहरण केल्याचे कलम व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण ( पोकसो ) कायद्यातील तरतुदीप्रमाणे सदर गुन्ह्याचे कलमात वाढ करून आरोपी यांस दिनांक 12. 6. 2023 रोजी अटक केली त्याचप्रमाणे कुमारी निर्भयास सोलापूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
            अटक आरोपीने श्री एस. के. लोणकर विधीज्ञ, टेंभुर्णी यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला असता सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादी पालकांतर्फे ऍड जी.डी. जगताप यांचे मार्फत सदर जामीन अर्जास जोरदार हरकत घेण्यात आली मेहरबान न्यायालयाने पीडीतेचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात नोंदविला. आरोपीच्या वतीने केलेला कायदेशीर मुद्द्यावरील युक्तिवाद ग्राह्य धरत मे.  न्यायाधीशांनी आरोपीस जामीन मंजूर केला. सदर आरोपीतर्फे श्री. विधीज्ञ सच्चिदानंद लोणकर  व श्री. योगीराज गणेश बारवे विधिज्ञ तर मूळ फिर्यादी पालकांतर्फे विधिज्ञ जी.डी. जगताप तसेच सरकारी पक्षातर्फे सरकारी विधीज्ञ कदम मॅडम यांनी काम पाहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा