विठ्ठलराव शिंदे प्राथमिक शिक्षक सहपतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊराव शिंदे..
व्हाईस चेअरमन पदी मॅडम कादरी शेख
बेंबळे। प्रतिनिधी
माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निमगाव टे येथील भाऊराव शिंदे यांची तर व्हाइस चेअरमनपदी नगरपालिका शिक्षिका कादरी शेख मॅडम यांची बिनविरोध निवड झाली.
कुर्डुवाडी येथे नुतन संचालक मंडळाची सभा निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर लेंडवे यांचे मार्गदर्शना खाली व सहाय्यक निबंधक कार्यालय माढा येथील बागल मॅडम यांचे उपस्थित संपन्न झाली या वेळी चेअरमनपदा साठी भाऊराव शिंदे यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी नगरपालिका शिक्षीका श्रीमती कादरी शेख मॅडम यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही नीवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
या वेळीनुतन संचालक संतोष जाधव संजय कुटे शंकर थोरात प्रमोद लोंढे सुधीर गुंड दिनेश उरमोडे मनोज पवार मोतीराम शिंदे सौ अनिता काशिद डोंगळे मॅडम सुरेखा मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच पतसंस्थेचे संस्थापक नां पा कुलकर्णी बाळासाहेब काशिद ज्ञानेश्वर चटे दत्ता पाटील रामेश्वर लोंढे इक्बाल शेख उपस्थित होते.
विशेष माहिती अशी की संस्थेचा राज्यात सर्वात कमी व्याजदर असुन द सा द से 5 रू 40 पैसे दराने सुमारे 5 लाख रु.पर्यंत कर्ज देण्यात येते.इमारत निधी सुमारे 15 लाख रुपये शिल्लक आहे.लवकरच संस्थेची भव्यदिव्य इमारत बांधण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, संस्थेचा कारभार पारदर्शक करून सभासदासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतील असे नुतन चेअरमन भाऊराव शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
नुतन चेअरमन व्हा.चेअरमन व नुतन संचालक मंडळाचे आमदार बबनदादा शिंदे आमदार संजयमामा शिंदे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे सभापती विक्रमसिंह शिंदे माढा वेल्फेअर चे अध्यक्ष धनराज शिंदे विठ्ठल शुगरचे कार्यकारी संचालक तथा निमगाव टे. चे सरपंच यशवंत शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा