Breaking

सोमवार, ३१ जुलै, २०२३

पिलीव बसस्थानकावर एस टी बसेस थांबत नसल्यामुळे प्रवासी संतप्त लवकरच आंदोलन


पिलीव  बसस्थानकावर  एस टी बसेस थांबत  नसल्यामुळे  प्रवासी  संतप्त  लवकरच  आंदोलन 




         पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-  माळशिरस तालुक्यातील  पिलीव  हे मुख्य  गाव  असुन  आसपासच्या  दहा - बारा गावातील  नागरिकांसाठी याठिकाणी  मुख्य  बसस्थानक  आहे. पुर्वी पासुन  याठिकाणी  प्रत्येक  एस टी  बस ही दहा - पंधरा  मिनिटे थांबल्याशिवाय पुढे  जातच नव्हती  मात्र गेल्या  काही दिवसापासुन  याठिकाणी  एस टी बसेस‌चा नाष्टयासाठी बसेस थांबणे बंद झाले  अगोदर या बसेस‌ साळमुखवाडी  चौकात  आता तांदुळवाडी  व सुळेवाडी  घाटाच्या  वरती राजवाडा हया हॉटेलवर  बसेस थांबविण्यात येत आहेत  याठिकाणी  अधिकृत थांबा नाहीच पण केवळ बसचालक व कंडक्टर  यांना फुकट नाष्टा  मिळत असल्यामुळे हे महाशय महामंडळाची परवानगी  नसतानाही  याठिकाणी  पंधरा विस मिनिटे बस थांबवत आहेत .सातारा,सोलापूर  व पंढरपूर  या आगाराच्या  बसेस या रस्तावर मोठ्या  प्रमाणात  आहेत .पण या बसचालक वाहक यांच्या  मनमानी  कारभारामुळे  पिलीव या बसस्थानकावर  अनेक एस टी बसेस सध्या  थांबतच नाहीत तर काही महाशय बसस्थानक  सोडुन दुरवर बस थांबवित‌आहेत यामुळे  पिलीव  येथील  प्रवासी तसेच  विदयार्थी  यांना  तासनतास  बसस्थानकावर  चक्क ताटकळत बसावे लागत आहे. दोन - तिन तास चक्क रस्त्यावर  थांबुनही बसच  थांबत नाही  अशी  परिस्थिती  सध्या  पिलीव येथील  प्रवासी वर्गाला  अनुभवायला मिळत आहे. जर‌ का याठिकाणी  एस टी  बस थांबविली नाही  तर आपण रस्ता  रोको  करणार  असल्याचे  प्रवासी वर्गामधुन बोलले जात आहे. याविषयी  सोलापूर, पंढरपूर  व सातारा आगाराने दखल घेऊन प्रवाशयांची होणारी गैरसोय  ताबडतोब  टाळावी अशी मागणी  पिलीव  परीसरातील  प्रवाशामधुन होत आहे.       यामुळे रविवारी  दुपारी  प्रवासी  वर्गामधुन उद्रेक  दिसुन  आला  प्रवासांनी लातुर  - वाई  एस टी  बस अडवून  आंदोलन  केले मात्र या बस मध्ये  एकही प्रवासी या गाडीत घेतलाच नाही.      चौकट  - पिलीव येथील  अडव्होकेट वैभव मेथवडे  यांना याविषयी  विचारले असता रविवारी  मी मुलासह दहीवडी गावाला  जाणयासाठी  थांबलो असता दुपारी  एक - दीड वाजेपर्यंत  एकाही बस चालकाने पिलीव बसस्थानकावर  एकही प्रवासी  घेतलाच नाही  एवढी विचीत्र परिस्थिती  सध्या  याठिकाणी  पहावयास मिळत आहे.                 फोटो  - पिलीव बसस्थानकावर बस स्थानकावर  बस थांबत नसल्यामुळे  संतप्त  झालेले  प्रवासी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा