Breaking

रविवार, ९ जुलै, २०२३

पोलिस उपनिरीक्षक पदी निवडीबद्दल सुषमा पाटील हिचा प्रशालेच्या वतीने सत्कार संपन्न



पोलिस उपनिरीक्षक पदी निवडीबद्दल सुषमा पाटील हिचा प्रशालेच्या वतीने सत्कार संपन्न




कन्हेरगाव(प्रतिनिधी)
           दि ८ जुलै रोजी अकोले (खुर्द) येथे मा. बबनरावजी शिंदे विद्यालयाची विद्यार्थिनी सुषमा पाटील हिची PSI पदी निवडीबद्दल प्रशालेच्या वतीने मा प्राचार्य श्री राजेंद ठोंबरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी सत्कार ला उत्तर देताना पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील म्हणाले की शिक्षक व आईवडिलांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे हे यश मिळाल्याचे सांगून ध्येय निश्चित करून मनापासून अभ्यास केल्यास तुम्हालाही यश प्राप्त होईल असा आशावाद व्यक्त करून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला .
         कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी पोलिस उपनिरीक्षक सुषमा पाटील हिच्या शालेय जीवनातील जिद्द , चिकाटी व नम्रतेच्या आठवणी सांगत पालक रामभाऊ पाटील यांच्या मुलींच्या शिक्षणासाठीच्या जिद्दीचे कौतुक करत त्यांचाही सत्कार करून यशा बद्दल दोघांचेही कौतुक वअभिनंदन करून पुढील उज्जवल कार्यास शुभेच्छा दिल्या . तसेच प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री लक्ष्मण लोहार सर यांचे द्वितीय चिरंजीव अक्षय लक्ष्मण पवार ( लोहार ) याचीही PSI पदी निवड झाल्याबद्दल अकल्पित यश संपादन केल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले .
            या कार्यक्रम प्रसंगी रामभाऊतात्या पाटील ,अशोकआबा पाटील , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद , प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .करमाळा तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयमामा शिंदे , संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र अभिमान ठोंबरे सर, जेष्ठ शिक्षक  संभाजी अनपट सर  , स . रा . मोरे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे मॅडम , यशवंत प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अर्चना नेवसे मॅडम तसेच प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रा. एम ए घुले सर यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा