*हैद्राबाद मुक्ती संग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान विषयावर 75गावात व्याखाने*
*औसा प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
लातूर:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व हैद्राबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील पंच्याहत्तर गावातून व्याख्याने दिली जात आहेत.
हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान या विषयावर दिली जाणारी ही व्याख्याने
मळवटी,हरंगुळ, कातपुर,खरोसा,हिसामाबाद, हलकी, बाकली, भाडगाव,रमजानपुर, कव्वा, अरजखेडा,महाराणाप्रताप नगर, लातूर, एरंडी, सारोळा, सारणी, नांदुर्गा, ऊजनी, आशिव,मातोळा, औसा, किल्लारी, हिप्परगा, किलज, गंधोरा,माणूसमारवाडी, गादवड, चिखुर्डा,धनेगाव, रेणुका नगर, शिवणीवाडी, चलबुर्गा,फत्तेपूर,अंकुलगा, अजनी, वांजरखेडा, डोंगरगाव बोरी, वासनगाव, चांडेश्वर, चाटा, तुंगी, नागझरी, वासनगाव, खोपेगाव, करकट्टा, एम आय डी सी लातूर, हरंगुळ,याकतपुर, माळकोंडजी, गुबाळ, मंगरूळ, लिंबाळादाऊ, कवळी, पोमादेवीगावी जवळगा, मंगरूळ, सिकंदर पुर, सारोळा लातूर, वरवडा, समदर्गा, तुळजापूर, वडगाव देव, होर्टी, चिकुंद्रा, कार्ला, येळवट या गावातुन दिनांक 17सप्टेंबर ते 26सप्टेंबर 2023या काळात शाळा,ग्रामपंचायत,वाचनालय,महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, आदि सार्वजनिक ठिकाणी आयोजित केली आहेत.
ही व्याख्याने रंजना चव्हाण, प्रा दत्तात्रय सुरवसे, बालाजी जाधव, ब्रिजलाल कदम, नीता मगर, नयन भादुले, सोमनाथ काजळे, अंगद वाघमारे, जगदीश पाटील, सुधाताई कांबळे , अहिल्या फुटाणे, संजय भोईटे, सतिश भोसले ही मान्यवर मंडळी देत आहेत.
यांना विवेकानंद भोसले,विजय चव्हाण, अर्जुन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. तर प्रा दौलतराव घोलकर व कमलाकर सावंत यांनी क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवताळा या संस्थेच्या वतीने व्याख्यात्यांची कार्यशाळा आयोजित करून सर्व व्याख्यात्यांचा गौरव केला तर देवताळा देवी मंदिर ट्रस्ट कडूनही सर्वांना शुभेच्छा व आशिर्वाद देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा