Breaking

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

*सोमनाथ काजळे यांचे हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या जीवनावर व्याख्यान* *



*सोमनाथ काजळे यांचे हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या जीवनावर व्याख्यान* 


            *औसा प्रतिनिधी/ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

लातूर:जिल्ह्यातील सारोळा (एरंडी )ता. औसा या गावातील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान या विषयावर विद्यालयातील शिक्षक श्री. सोमनाथ काजळे यांनी व्याख्यान दिले. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. सुरेश कदम हे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणपती भोसले उपस्थित होते. 
यावेळी श्री सोमनाथ काजळे यांनी क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे जीवन चरित्र व त्यांचे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदान याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व विध्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम जागृत केले.शेवटी सुनील सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा