अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात स्वातंत्र्य दिन साजरा
अकलुज प्रतिनिधी---हुसेन मुलाणी
सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा,अकलूज प्रशालेत आज - १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी अकलूज पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते.तसेच .समीर पठाण ,.पांडुरंग जाधव उपस्थित होते.तसेच प्रशाला समितीच्या सदस्या .कुलकर्णी मॅडम.जावळे मॅडम ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम उपस्थित होत्या.
प्रारंभी सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशालेतील आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी आपल्या मधुर आवाजात राष्ट्रगीत,ध्वजगीत, राज्यगीत गायन केले.त्यानंतर मेरी मिट्ठी मेरा देश पंचप्राण शपथ घेण्यात आली.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संचलनाचे शिस्तबद्ध सादरीकरण केले.तद्नंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीचे सुंदर असे प्रात्यक्षिक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम यांनी केले.
त्यानंतर सन्माननीय अतिथींचा सन्मान करण्यात आला. तद्नंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनोज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.साहेबांनी उपस्थित सर्वांना बहुमोल मार्गदर्शन केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर "शरीर माध्यम खलू धर्म साधनंम" या उक्तीप्रमाणे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचे (पिरॅमिड चे) सादरीकरण केले.निरोगी शरीरासाठी व्यायामाची गरज आहे हा संदेश त्यांनी यातुन दिला.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी कलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर करुन सर्वांची मने जिंकली.विद्यार्थी कलाकारांनी आपल्या नृत्यामधून सर्वधर्म समभाव व एकात्मतेचा संदेश दिला.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश सुर्यवंशी सर यांनी केले.शेवटी सारे जहाँ से अच्छा या समुहगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा