कुसमोड येथील नागेश लेंगरे यांच्या चार शेळया लांडग्यांनी केल्या ठार.
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरु असताना लांडग्यांनी सुद्धा धुमाकूळ घातला आहे. कुसमोड येथील शेरी रस्त्यावरील नागेश नारायण लेंगरे यांच्या घरासमोर वाघरेत कोंडलेल्या चार शेळया लांडग्यांनी ठार करून खाऊन टाकल्या बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे नागेश लेंगरे यांचे साठ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. याच भागात गेल्या आठवड्यात विजय मोरे यांच्या घरासमोरील दहा हजार किमतीचा बोकड लांडगयाने नेला होता .यानंतर या भागातील ही दुसरी घटना आहे. नागेश लेंगरे यांच्या लांडगयाने ठार केलेल्या शेळयांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली तसेच मळोलीचे पशुवैदयकीय अधिकारी यांनी रितसर पंचनामा केला आहे. शासनाने नागेश लेंगरे यांना सदरच्या नुकसानीची भरपाई दयावी अशी मागणी नागेश लेंगरे यांच्या कडून केली जात आहे. या भागात गेल्या काही दिवसापासुन तिन लांडगयांचा वावर दिसत आहे .याचा वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनमधुन होत आहे.
फोटो - कुसमोड येथील नागेश लेंगरे यांच्या लांडगयाने ठार केलेल्या चार शेळया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा