देऊळगाव ते कोळगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम... ग्रामस्थांसह प्रहारचे सोमवारी आमरण उपोषण....*
श्रीगोंदा-नितीन रोही.
देऊळगाव ते कोळगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम मागील पंधरा दिवसापूर्वी देऊळगाव ते ढोरजा पूर्ण झाल आहे. फक्त पंधरा दिवस झाल्यानंतर दुसऱ्यांदा पॅच मारण्याची वेळ ठेकेदारावर आली आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या परंतु काही उपयोग झाला नाही कारण अधिकारी लाच घेऊन गप्प बसले, परंतु स्थानिकांनी आवाज उठवला आणि येत्या सोमवारी म्हणजेच 7/8 2023 रोजी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी ग्रामस्थांच्या व प्रहार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्णपणे खसला आहे आणि पुढील काही दिवसांत पूर्ण रस्ता शंभर टक्के खराब होणार आहे. वरिष्ठांना बोलायला गेलं की ते बोलतात त्यांच्याकडे दोन वर्ष दुरुस्तीचे काम आहे, परंतु काम पूर्ण होताच खचत असेल तर दोन वर्षात काय परिस्थिती होईल ? एक तर कित्येक वर्षानंतर या रस्त्यावर निधी पडला आहे आणि अशा पद्धतीने काम होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे यामुळे काही ग्रामस्थांनी व प्रहार संघटनेने आवाज उठवून उपोषण करण्याबाबत ठरवलं आहे.
निवेदनावर प्रहारचे माजी शहराध्यक्ष माधव बनसुडे,संतोष गायकवाड,पांडुरंग बाबर,नितीन बाबर यांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा