महसूलसप्ताह निमित्त माजी सैनिकांचा सन्मान.... ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे मोफत वाटप...
बेंबळे ।प्रतिनिधी। फोटो
बेंबळे येथे महसूल सप्ताहानिमित्त सेवानिवृत्त माजी सैनिक मेजर निवृत्ती कदम व मेजर मधुकर खोत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित शेतकऱ्यांना मोफत ७/१२ व ८-अ ऊतार्यांचे वाटप करण्यात आले. मेजर निवृत्ती कदम यांनी देशाच्या विवीध ठिकाणी सैनिकी सेवा बजावली असून कारगिल युद्धाच्या वेळी द्रास, लेह, सोनमर्ग अशा कठीण भागात वाहनातून दारूगोळा व इतर युद्ध साहित्य पोहोचवण्याचे काम, युद्धजन्य परिस्थिती संपेपर्यंत कुशलतेने पार पाडले होते, तर मेजर मधुकर खोत यांनीही जम्मू कश्मीर श्रीनगर भागात दहशतवाद्याविरुद्ध व तसेच बॉर्डरवर देखील आपली महत्त्वाची सैनिकी सेवा बजावली होती, या दोन्ही व्यक्ती बेंबळे गावास निश्चित अभिमानास्पद आहेत. बेंबळे मंडल निरीक्षक गंगासागर सोनवणे व सरपंच विजय पवार यांचे हस्ते या दोघा माजी सैनिकांचा यथोचित हृद्य सन्मान करण्यात आला व त्यांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करून आम्ही सदैव आपणास सहकार्यास तयार आहोत असे आश्वासीत करण्यात आले.याप्रसंगी तलाठी अजय चव्हाण, सहाय्यक शहाजी हुलगे ,पोलीस पाटील बिभिषण कीर्ते, माजी उपसरपंच व कृषी भूषण सोमनाथ हुलगे, सामाजिक कार्यकर्ते समाधान सलगर पाटील, वस्ताद बाशूभाई मुलाणी ,दत्तात्रय कावळे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा