आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील खालापुर येथे जाऊन सहा अनाथ मुलींना तीन लाख रुपयाची मदत .
कन्हेरगांव / प्रतिनिधी राजेंद्र केदार
करमाळा तालुक्याचे आमदार
संजयमामा शिंदे यांनी बुधवारी 16 आगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे वीस ते पंचवीस सहकाऱ्यांना स्वतः सोबत घेऊन जात तेथील दरडग्रस्त दुर्घटनेतील सहा अनाथ मुलींना तीन लाख रुपयांची रोख स्वरूपात मदत केली . आमदार संजयमामा शिंदे यांनी पुनर्वशीत गावात भेट देऊन तेथील नागरिकांशी थेट संवाद साधला. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना पुनर्वशीत केलेल्या लोकांची सविस्तर माहिती दिली . यावेळी सहा अनाथ मुलींना रोख स्वरूपात तीन लाखांची मदत आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील , संचालक दिलीप भोसले , संचालक संतोष अनभुले , संचालक धनंजय मोरे , संचालक नागेश खटके पाटील , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नागाभाऊ खटके , माजी सरपंच विक्रम उरमोडे , शिव विचार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय खटके पाटील , यशोदीप उद्योग समूहाचे गोरख खटके , गणेश व्यवहारे , सचिन पवार , राजेंद्र केदार , सचिन होदाडे , किरण जाधव , परमेश्वर खरात , गणेश स्वामी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा