*मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम लोहटा येथे संपन्न*.
*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहटा येथे दि 9ऑगष्ट 2023रोजी मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांनी मिट्टी कलशाचे पुजन केले. पंचप्रण शपथ घेतली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
वर्षाच्या अनुषंगाने क्रांतिदिनाचे महत्त्व विषद करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी भारत माता की जय व इतर घोषणा देत गावात मिट्टी कलशाची
प्रभात फेरी केली. कलशाचे पुजन करीत फेरी संपन्न झाली. यावेळी उपस्थित सरपंच गणेश चव्हाण तसेच मुख्यध्यपिका श्रीमती मनिषा जगताप मॅडम,श्री राहुल रोकडे सर, श्री मनोज बनकर सर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा