श्रीराम कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कृषी कार्यानुभव कार्यक्रम .
लागवडीपासून ते काढणीपर्यंत ची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
चाकोरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या श्रीराम कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या कृषी दुतांचे चाकोरे या गावात दि. १ ऑगस्ट रोजी आगमन झाले. कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने या गा-वात राबविण्यात येणार आहे यामध्ये कृषिदुत हे शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि कापणी पाश्चात प्रक्रिया तसेच शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती गावकऱ्यांना देणार आहेत.
शेतकऱ्यांना माहिती नसलेल्या गोष्टी माहिती होतील.या वेळी चाकोरे ग्रामपंचायतीचे राहुल वाघमारे, ग्रामविकास अधिकारी आर. एम. चव्हाण ,सरपंच नवनाथ जाधव, उपसरपंच सचिन कचरे, ग्रामपंचायत कर्मचारी विक्रम ढवळे, प्रगतशील बागायतदार अमित शिवाजी कुंभार , बापूराव वाघमोडे , हणमंत करडे , कृषिदुत रजनीश भोसले ,सिद्धराज देशमुख , बाबुराव धावडे, श्रेयस गुरव, निलेश काळे, विजय पाटील ,अर्शद शेख तसेच ग्रामस्थ व ग्रापंचायत सदस्य उपस्थित होते .
यासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शिका श्रीलेखा पाटील, सचिव अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. बी. हाके , उपप्राचार्य डॉ .एस. डी. राऊत , डॉ .जे .आय. शेख यांचे उपक्रमास मार्गदर्शन लाभले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा