Breaking

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

बेंबळे येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभ... मंडल अधिकारी सोनवणे यांचे मार्गदर्शन ....



बेंबळे येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभ...
 मंडल अधिकारी सोनवणे यांचे मार्गदर्शन  ....


बेंंबळे।प्रतीनिधी।                   

                  बेंबळे ते महसूल सप्ताहाचा शानदार शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी बेंबळे सज्याचे मंडल अधिकारी सर्कल गंगासागर सोनवणे, बेंबळे घोटी मिटकलवाडी चे तलाठी अजय चव्हाण सहाय्यक शहाजी हुलगे काही पदाधिकारी व मान्यवर नागरिक आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंडल अधिकारी गंगासागर सोनवणे म्हणाले की राज्य शासनाने यावर्षीपासून एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये एक तारखेला सप्ताह शुभारंभ करणे व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, दोन ऑगस्टला युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थी अनाथ अपंग अशा युवकांना लागणारे दाखले प्रमाणपत्र जागेवर प्रदान करणे व त्रुटी असतील तर दूर करणे, तीन ऑगस्टला एक हात मदतीचा यामध्ये जे शेतकरी अतिवृष्टी, पूर ,वादळ यामुळे त्यांचे घर शेती फळबाग जनावरे यांचे नुकसान झाले असेल तर आढावा घेऊन तात्काळ त्यांना दाखले देणे व नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीचे निवारण करणे, चार ऑगस्ट रोजी महसूल आदालतीचे आयोजन करून आपले सरकार पोर्टलवर प्राप्त तक्रारीची चौकशी करून निवारण करणे, पाच ऑगस्ट रोजी माजी सैनिक किंवा सध्या संरक्षण दलात कार्यरत असलेल्यांच्या सर्व अडचणी सोडवून तातडीने निकालात काढणे, सहा ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी समन्वयाने आपापसात चर्चा करून सूचना देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे व सात ऑगस्ट रोजी उपरोक्त कालावधीत घेण्यात आलेल्या उपक्रमाची फलनिष्पत्ती व उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन सप्ताहाची सांगता करणे अशा प्रकारे  हा सात दिवस कार्यक्रम चालणार आहे. तलाठी अजय चव्हाण यांनी  उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार मानले .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा