Breaking

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

शिराळ (टें) चे अभिजीत लोकरे यांची नगर विकास खाते अंतर्गत रचना सहाय्यक अधिकारी वर्ग -२ पदी निवड



शिराळ (टें) चे अभिजीत लोकरे  यांची नगर विकास खाते अंतर्गत रचना सहाय्यक अधिकारी वर्ग -२ पदी निवड

 
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
शिराळ (टें) ता. माढा येथील अभिजीत राजकुमार लोकरे यांची रचना सहाय्यक अधिकारी म्हणजे टाऊन प्लॅनिंग असिस्टंटपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल टेंभुर्णी परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचे शिक्षण पाचवी ते दहावी ना रा .हायस्कूल इंदापूर इथे व दहावीनंतर एस बी पाटील पॉलिटेक्निक इंदापूर येथे डिप्लोमा तर सांगली येथील वालचंद स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले आहे. ही अभियांत्रिकीतून पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.
चिकाटी,कष्ट आणि सातत्य याच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणले.
नक्कीच त्यांचा आदर्श पुढे ठेवून इतर विद्यार्थीही असेच यश संपादन करतील अशी  अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कालवा निरीक्षक राजकुमार परशुराम लोकरे यांचे चिरंजीव व निवृत्त उपविभागीय अधिकारी जलसंपदा विभाग श्री.एम पी लोकरे यांचे ते पुतणे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा