Breaking

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

टेंभुर्णीच्या कन्या प्रशालेचा सौरभ मिस्कीन ६२ किलो वजन गटात कुस्तीमध्ये राज्यात प्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


टेंभुर्णीच्या कन्या प्रशालेचा सौरभ मिस्कीन ६२ किलो वजन गटात कुस्तीमध्ये राज्यात प्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड      


                         टेंभुर्णी ( प्रतिनिधी) राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये टेंभुर्णीच्या कन्या प्रशालेचा सौरभ मिस्कीन याने टेंभुर्णी चे नाव राज्य पातळीवर उंचावले असून क्रीडाशिक्षक अर्जुन खटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने टेंभुर्णी कन्या प्रशालेचा संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्ती स्पर्धेमध्ये ठसा उमटवला असून त्याची आंतरराज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने टेंभुर्णी कन्या प्रसाला येथे व त्याचे क्रीडाशिक्षक अर्जुन खटके सर वर्ग शिक्षक भारत माने सर मुख्याध्यापक एस आर पवार सर यांचे कौतुक होत असून त्यांच्या या यशाबद्दल टेंभुर्णी करा कडुन अभिनंदनचा आता वर्षाव होत आहे.
  याबाबतीत त सविस्तर वृत्तांत असा की उदगीर जिल्हा लातुर येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सौरभ तानाजी मिस्कीन याने ६२ किलो वजन गटांमध्ये कुस्ती क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवत राज्यस्तरीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याची निवड आंतरराज्य कुस्ती स्पर्धेसाठी झाली असून त्याच्या या यशाबद्दल  पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे , भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश उर्फ बाबाराजे बोबडे , शिवसेनेचे नेते संजय कोकाटे , भारतीय जनता पार्टी चे माजी माढा तालुका उपाध्यक्ष विष्णु बिचकुले,  व मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा