*कै.विठ्ठलरावजी शिंदे अंबाड विद्यालयाच्या कु संजीवनी शिवाजी ढाणे हीची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड*
माढा (तालुका प्रतिनिधी)
दिनांक 24 ते 27 सप्टेंबर 2023 रोजी साने गुरूजी विद्यालय कुरुंदवाड(कोल्हापूर) येथे शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये कै.विठ्ठलराव शिंदे विद्यालय अंबाडच्या दोन खेळाडूंनी सोलापूर जिल्ह्यात पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
आपल्या विद्यालयाची संजीवनी शिवाजी ढाणे अकरावी विज्ञान शाखेतून शिकत असून तिने शालेय कुस्ती मध्ये 53 किलो वजन गटात खेळात आहे
त्यामध्ये पहिली कुस्ती नेहा पाटील कोल्हापूर सोबत 10 - 0 ने जिंकली , व सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळविला , सेमीफायनल मध्ये जानवी दवणे अमरावती हिच्यासोबत लागली होती त्यामध्ये जानवी ला चीत पट करून फायनल कुस्ती साठी निवड झाली , फायनल कुस्तीमध्ये सोनाली शिंदे क्रीडा प्रबोधिनी सोबत संजीवनी ची कुस्ती झाली त्यामध्ये देखील 10- 0 करून सोनालीस चीत पट केले व महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला , तसेच विज्ञान शाखेतील इयत्ता अकरावीतील अश्विनी सोपान सिदवडकर हिने 36-40 वजन गटात साखळी पद्धतीने चार कुस्त्या करत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला . संजीवनी ने प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य जवानसिंग रजपूत, वस्ताद अण्णा ढाणे, शिवाजी ढाणे, क्रीडा शिक्षक विलास केदार, दत्तात्रय देवकते, शिवाजी बोंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल माढा तालुक्याचे आ. बबनदादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयमामा शिंदे, संस्थेचे सचिव व अकोले खुर्द विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे, कन्हेरगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल लोंढे, स.रा.मोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरवसे, यशवंत प्रायमरी स्कूलचे प्राचार्य सोमनाथ होनमोटे, जेष्ठ शिक्षक मच्छिंद्र पाटील, ज्युनिअर विभाग विष्णू घाडगे, सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षतेकर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थीनी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मध्यप्रदेश येथे होणार आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा