Breaking

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

जालना जिल्ह्यातील सराटी येथील पोलिसी लाठीचार्ज विरुद्ध कुर्डुवाडी शहरात कडकडीत बंद


*जालना जिल्ह्यातील सराटी येथील पोलिसी लाठीचार्ज विरुद्ध कुर्डुवाडी शहरात कडकडीत बंद

      *शेकडोंच्या सकल मराठा क्रांती मुकमोर्चाच्या वतीने प्रांत अधिका-यांना निवेदन*
   *सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज चौकात रास्ता रोको*
        *बंद न पाळण्याच्या सकल हिंदू समाजाच्या आवाहनास न जुमानता स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद.*

  कुर्डुवाडी प्रतिनिधी/ अरूण कोरे 

 कुर्डुवाडी:- जालना जिल्ह्यातील सराटी येथील पोलिसी लाठीचार्जच्या निषेधार्थ आज कुर्डुवाडी शहरात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.विशेष म्हणजे कुर्डुवाडी शहरात बंद न पाळण्याच्या पार्श्वभूमीवर माढा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद न पाळण्याच्या केलेल्या आवाहनास न जुमानता हा बंद शांततेत पार पडला.
सकल मराठा समाज समन्वयक संजय दादा टोणपे, सुरेश बागल पाटील, माजी नगराध्यक्ष समीर भाई मुलानी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ताजी काकडे, जि.प सदस्य आप्पासाहेब उबाळे, शिवव्याख्याते हर्षल बागल,  माजी नगरसेवक बाबासाहेब गवळी , उपनगराध्यक्ष हरिभाऊ बागल , माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर,  माजी नगरसेवक संभाजी सातव , वंचित बहुजन बहुजन आघाडीचे  प्रदीप सोनटक्के , विनोद सोनवणे  सरपंच नितीन कुंभार , उपसरपंच गणेश बागल  , बालाजी बागल,  सुहास दादा टोणपे,  श्रीकांत पाटील मावळा ग्रुप , वाहिद शेख रेल कामगार सेना जिल्हाध्यक्ष,  शिवाजी भाऊ गवळी,  अनिल आबा गवळी,  संतोष शेंडे, संभाजी ब्रिगेड माढा तालुका अध्यक्ष सौरभ भोसले , शहर अध्यक्ष नवनाथ कडबाने , क्षितिज टोणपे, लालासाहेब टोणपे, राहुल टोणपे समन्वयक प्रशांत बागल, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जगताप , मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष निलेश देशमुख , विलास नाना उबाळे, लक्ष्मण बागल , प्रमोद बागल , सूधिर बागल , मच्छिंद्र कदम , भिमा जाधव , तुषार हाके , जितेंद्र गायकवाड , यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा