रक्तदान मोहिमेत बेंबळे गावचा प्रथम क्रमांक...
....344 बाटल्या रक्त संकलन...
बेंबळे।प्रतिनिधी।
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या 72 व्या वाढदिवसाचे निमित्ताने माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील मतदारसंघात समाविष्ट असलेले गावोगावी रक्तदान शिबिर घेण्यात आले .माढा तालुक्यात बेंबळे येथे 344 व्यक्तींनी रक्तदान केले व माढा तालुक्यातील 109 गावांमधून बेंबळे गावाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीपराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर आघाडीने 272 बाटल्या रक्त संकलन केले, यासाठी डॉक्टर भीमराव पवार रत्नदीप भोसले बाळासाहेब भोसले तानाजी मिस्किन सचिन पवार अशोक भोसले दिगंबर भोसले यांचे सहित इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. तसेच माजी सरपंच कैलास भोसले व ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विमलेश्वर आघाडी, भोसले पार्टी ग्रुप यांचे तर्फे 72 बाटल्या रक्त संकलन केले . यासाठी ऊस भूषण सोमनाथ हुलगे बाळू पवार ज्योतीराम नागटिळक नवनाथ हुंबे बालाजी वांगधरे बापू काळे सदाशिव भोसले तानाजी भोसले समाधान भोसले या मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले .दोन्ही ग्रुपचे एकूण 344 रक्त बाटल्या संकलन झाले असून माढा तालुक्यातील 109 गावांमध्ये बेंबळे गावचा प्रथम क्रमांक आलेला आहे. याबद्दल आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे दूध संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब शिंदे माजी सभापती विक्रम दादा शिंदे व इतर अनेकांनी बेंबळेकरांचे विशेष अभिनंदन केले आहे.
चौकट ....
बेंबळे येथे रक्तदान शिबिरा प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांनी भेट दिली असता त्यांचा फेटा शाल श्रीफळ व गुलाब पुष्पहार देऊन व तसेच वाढदिवसानिमित्त केक कापून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तसेच 'उद्दिष्ट 100 टन प्लस 'या मोहिमेचे प्रमुख ऊस भूषण सोमनाथ तात्या हुलगे यांचे तर्फे संकल्प फाउंडेशन कर्मयोगी बबनराव शिंदे नेत्रालयास 5हजार555 रुपयाचा चेक आमदार बबनदादा शिंदे त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा