सोलापूर जिल्ह्यातील शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन मोफत वितरण.
ग्रामीण रोटरी कॉप्स यांच्या पुढाकाराने उपक्रम
टेंभुर्णी (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन मोफत वितरण करण्यात आहे माढा अणि माळशिरस तालुक्यातील 50 हून अधिक शाळांनी सदर सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन चा लाभ घेतला ग्रामीण रोटरी कॉप्स यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम घेण्यात आला यासाठी लाइफ सायन्स कंपनी मुंबईच्यावतीने नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड लातूर शाखा डॉ. मेतन फाउंडेशन, सोलापूर व रोटरी क्लब लातूर होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने. हा उपक्रम घेतला जात आहे रोटरी क्लब टेंभुर्णी च्या रोटरी सांस्कृतिक भवन येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता समारंभपूर्वक सदर डिस्पोजेबल मशीनचे विद्यालयांना वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब टेंभुर्णी यांनी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी ग्रामीण कॉप्स चे अध्यक्ष यशवंत हांडे यांनी केले यावेळी सदर उपक्रमाबद्दल रोटरीन डॉ व्यंकटेश मेतन रो डॉ विजयकुमार राठी श्री आशिष बाहेती व अनिरुद्ध साळुंखे यांनी मार्गदर्शन केले या वेळी ग्रामीण रोटरी कॉप्स चे सांगोला अकलूज करकंब रोटरी क्लबचे सदस्य आवर्जून उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब टेंभुर्णीचे अध्यक्ष महेश कोठारे सचिव तनवीर मुलानी व श्रीकांत लोंढे ,रमेश पाटील, नागेश बोबडे,पपेश पाटील, संदीप जाधव, सुजित बेलपत्रे, पारस कटारिया, योगेश भनगे, महेश कोकीळ अनिल बाबर, दिलीप वेदपाठक यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश कोठारी यांनी केले सूत्रसंचालन संदीप मोकाशी व सचिन होदाडे यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा