Breaking

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संयमी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप



बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संयमी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप

कन्हेरगाव(प्रतिनिधी)
           माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे साहेब यांच्या 72 व्या वाढदिवसानिमत्त   संयमी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रांझणी यांच्या वतीने  जि.प.प्राथमिक शाळा रांझणी ता. माढा येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घाटकातील विध्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तसेच संस्थेच्या वतीने  उबाळे वस्ती,भीमानगर येथील प्राथमिक शाळेतील सर्वच  विध्यार्थ्यांना मोफत प्रत्येकी पेन व बिस्कीट पुढ्याचे वाटप केले.
             तसेच 15 ऑगष्ठ रोजी संयमी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने रांझणी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील ज्या ज्या विधार्थ्यांनी भाषण केले अशा 25 विध्यार्थ्यांना व  देशभक्ती पर ग्रुप डान्स  झालेल्या 4 गाण्यातील बाल कलाकरांना देखील मोफत पेन चे वाटप करून, रांझणी येथील बालवाडी ते 7 वी पर्यंतच्या सर्वच विध्यार्थ्यांना 15 ऑगष्ठ निमित्त गुड्डे बिस्कीट पुढ्याचे वाटप  करण्यात आले होते.  

       संयमी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेने अशा अनेक  प्रकारचे समाजउपयोगी कार्यक्रम नेहमी घेत या मध्ये रक्तदान शिबिरे, महिला मेळावे, महिला हेल्थ चेकअप, गरजू पेसेंटना  हॉस्पिटल मध्ये सहकार्य , कोरोना काळात गरजू कुटुंबाना आन्नधान्य किटचे वाटप, इंदापूर अनाथ बाल आश्रम ला मदत, शालेय विध्यर्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करत असते.
या वेळी प्रमुख उपस्थिती संयमी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता जाधव, सचिवा सौ. अश्विनी जाधव , संचालक हनुमंत चव्हाण, संचालक सुभाष जाधव, शिक्षक स्टाफ मधून रमेश लोंडे,  हनुमंत राजमाने,  अनिल इंदलकर, रामकांत कांबळे, हारून तांबोळी, किशोरकुमार आडकर,  सुहास औताडे, सौ. स्वाती माळवदकर ही सर्व शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते. 

चौकट -
          रांझणी तालुका माढा येथील संयमी बहुउद्देशीय सेवा भावी संस्था रांझणी तालुका माढा या संस्थेच्या वतीने पहिला #सामाजिक आमदार# पुरस्कार माढा तालुक्याचे भाग्यविधाते,हरित धवलक्रांतीचे प्रणेते,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनदादा शिंदे साहेब यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण 19 ऑक्टोबर रोजी संयमी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रांझणी तालुका माढा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरानंतर संध्याकाळी सात वाजता अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात आमदार बबनदादा शिंदे यांना #सामाजिक आमदार# या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा