Breaking

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

इंडिया आघाडीच्या 16 ऑक्टोबर च्या जाहीर सभेत रायगड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शरद पवार जाहीर करणार?



इंडिया आघाडीच्या 16 ऑक्टोबर च्या जाहीर सभेत रायगड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शरद पवार जाहीर करणार ?


मुंबई (मिलिंद माने) 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यातील सर्वच पक्ष लागले असून राज्यातील राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात पडलेल्या फुटी नंतर सत्तेची समीकरणे बदलली असून पक्षनिष्ठा पेक्षा आर्थिक निकषावर यंदाच्या लोकसभा निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहे त्यातच रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटी नंतर तटकरे हे अजित पवार गटात सामील झाल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार कमालीचे संतप्त झाले असून रायगड लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव 16 तारखेला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या जाहीर मेळाव्यात जाहीर करणार असल्याने 16 ऑक्टोबर चा श्रीवर्धन येथील इंडिया आघाडीच्या मेळावाकडे राज्यातील सत्ताधारीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शाखा पक्षाचे जयंत पाटील यांनी एक हाती वर्चस्व मिळवल्याने रायगड जिल्हा पुन्हा एकदा शेकापक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याच्या तयारीत आहे शेतकरी कामगार पक्ष हा देखील महाविकास आघाडीचा एक भाग असल्याने त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे तटकरे यांनी बंडखोरी करून अजित पवार यांच्या समवेत सामील झाल्याने शरद पवार हे कमालीचे संतप्त झाले आहे त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तटकरे यांना काय काय कमी केले होते असा देखील उपयोजित टोला लगावला होता त्यावरूनच शरद पवार हे तटकरे यांना चांगला धडा शिकवण्याच्या तयारीला लागले असल्याचे राष्ट्रवादी गोटातून चर्चेला ऐकण्यास मिळत आहे
रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदा दीड वर्षाचा कार्यकाळानंतर सुनील तटकरे यांनी कोबीच्या काळात या मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यातच त्यांची कन्या आधीच तटकरे ही महाविकास आघाडीमध्ये मंत्री व रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असल्याने पालकमंत्री पदावरून शिवसेना व राष्ट्रवादी असा संघर्ष रायगड जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला आहे

महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर दीड वर्षानंतर रायगडचे पालकमंत्री पद अद्याप रिक्त आहे त्यातच राष्ट्रवादी दोन गट पडून अजित पवार गट हा शिंदे फडणवीस सरकार मध्ये सत्तेत सामील झाला व पुन्हा एकदा आधीची तटकरे या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री झाल्या मात्र पालकमंत्री पद त्यांना मिळू नये यासाठी पुन्हा रायगड मधील तीन आमदार एकवटले आहेत त्यातच रायगड लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार तटकरे हे निवडणूक लढण्याच्या मनस्थितीत नाही अशी चर्चा रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांपासून सर्वच पक्षांमध्ये जोरदार चर्चिली जाऊ लागली आहे
रायगड लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची 16 ऑक्टोबर रोजी होत असलेली जाहीर सभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानले जाते. रायगड लोकसभा मतदारसंघात एकमेव राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य असणाऱ्या आदिती तटकरे यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली असल्याने पुन्हा एकदा शरद पवार हे मैदानात उतरले असून तटकरे कुटुंबाला ते टकमक टोक दाखवण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर करिष्मा आहे मात्र त्याच पद्धतीने राजकारणात त्यांना शत्रू देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जाते कामापुरता वापरायचे व सोडून द्यायचे ही तटकरेंची रणनीती असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघासहित रायगड जिल्ह्यातील सर्वच पक्ष तटकरे यांना चांगलाच ओळखून आहे निवडणुकीपुरता वापरणे व नंतर त्या कार्यकर्त्याला दूर सारणे या तटकरेंच्या राजकीय खेळीमुळे अनेक पदाधिकारी यांच्यासहित त्यांचे बंधू अनिल दत्तात्रय तटकरे व पुतणे अवधूत अनिल तटकरे हे सुनील तटकरे यांच्यापासून लांब गेले आहेत त्यात सुनील तटकरे हे पुन्हा रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढल्यास या निवडणुकीच्या काळात सर्व च हितशत्रू आपणास रायगड लोकसभा मतदारसंघातून पराभूत (टकमक टोकावरून कडेलोट)करतील. अशी दाट भीती सुनील तटकरे यांना असल्याने ते रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यापासून परावृत्त होत असून त्यातच त्यांना राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडे प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याने त्याचे कारण सांगून ते लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे

रायगड लोकसभा मतदारसंघावरून दावे प्रति दावे?
रायगड लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी तीन वेळा अनंत गीते यांनी निवडणूक लढवून विजयी झाले होते मात्र 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी 31255 मतांनी आघाडी घेत आनंद गीते यांचा पराभव केला या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले मात्र अनंत गीते यांना सत्तेत असूनही सत्तेचा परिश मात्र काही लागला नाही सत्तेचा पुरेपूर उपयोग तटकरे कुटुंबांनी घेतला त्यामुळे अनंत गीते हे मतदारसंघातून जवळपास गायब असल्याचे चित्र रायगड लोकसभा मतदारसंघात पाहण्यास मिळत होते त्यात त्यांचे मातोश्रीशी संबंध कमालीचे ताणले गेल्याचे सांगण्यात येत होते मात्र महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाली व त्यानंतरच्या दीड वर्षाच्या काळात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर विराजमान झाले त्यानंतर मात्र अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग ,श्रीवर्धन, महाड या तीन विधानसभा मतदारसंघाबरोबरच दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघात पुन्हा ते जाहीर सभेच्या माध्यमातून दिसू लागले

सन 2019 पासून पराभूत झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनंत गीते यांनी मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची शिवसैनिकांचे म्हणणे आहे त्यानंतरचा कोविडचा काळात त्यांचा पूर्णपणे मतदारसंघातील मतदारांशी संपर्क तुटला होता त्यामुळे गीतेंवर सर्वसामान्य शिवसैनिकांप्रमाणे त्यांच्या समाजातील कुणबी मतदार देखील त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात दुरावला होता

रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंद गीते हे पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले असले तरी पूर्वीप्रमाणे शिवसेना ही एकसंघ राहिलेली नाही तसेच अनंत गीते यांना जाम मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर मतदान मिळण्याची अपेक्षा आहे त्या दापोली व महाड या दोन मतदारसंघातील आमदार गीते यांना साम दाम दंड भेद वापरून विरोध करण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे परिणामी गीते यांना ही निवडणूक पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे

रायगड लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत विजयी झालेले विद्यमान खासदार सुनील तटकरे हे जरी अजित पवार गटाकडे गेले असले तरी ही जागा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने या मतदारसंघावर शरद पवार हेच दावा करणार असून महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार जरी राष्ट्रवादी व शिवसेनेचे खासदार व आमदार हे पक्ष सोडून गेले असले तरी तो मतदार संघ ज्या पक्षांनी लढवला होता त्याला द्यायचा असे अलिखित गणित असल्याने या  मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा शरद पवार हे कदापि सोडणार नसून तशी त्यांनी या मतदारसंघात चाचपणी देखील केली आहे
रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या गुहागर ,दापोली, महाड, श्रीवर्धन, अलिबाग व पेण. या सहा विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक असून या लोकसभा मतदारसंघात शरद पवार हे कदाचित रायगडचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कन्येला ते लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रायगड लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन ,महाड माणगाव या . तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चिली जाऊ लागली आहे त्यामुळे माजी खासदार अनंत गीते हे लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणूक लढण्याच्या आखाड्यात असले तरी रायगड लोकसभा मतदार संघाचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडल्यानंतरच रायगड लोकसभा मतदारसंघातील गणिते निर्णायक ठरू शकतात तुर्त तरी अनंत गीते हे मीच उमेदवार असल्याचे भाषवीत असले तरी 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या श्रीवर्धन येथील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या घरातील महिलेला उमेदवारी देतात की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला देणार याचे गणित 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेतच सुटणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा