Breaking

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

सकल मराठा समाजाच्या मोफत वधुवर मेळाव्याचा लाभ घ्यावा- मा. नगराध्यक्ष पोटे सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचा उपक्रम



सकल मराठा समाजाच्या मोफत वधुवर मेळाव्याचा लाभ घ्यावा- मा. नगराध्यक्ष पोटे

 सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचा उपक्रम



 श्रीगोंदा- नितीन रोही 

      सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने श्रीगोंदा शहरात मोफत मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 श्रीगोंदा शहरामध्ये पंतनगर कम्युनिटी हॉल,शनी चौक श्रीगोंदा, जि.अ.नगर  सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. या मोफत मेळाव्याचा जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील वधु-वर पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा.नगराध्यक्ष मनोहर पोटे व छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष भारती इंगवले यांनी केले आहे.
      आजकाल लग्न जमविण्यासाठी नातेवाईक, भाऊबंद , मामा यांना कुणालाही वेळ मिळत नाही . तसेच स्थळ मिळवणे फार कठीण समस्या होऊन बसली आहे . म्हणून अशा वधुवर मेळाव्याची गरज भासू लागली आहे . हा मेळावा मोफत आहे . मेळाव्याला स्वतः वधू वरांनी येणे गरजेचे आहे . मेळाव्यासाठी येताना एक बायोडाटा व फोटो आणावा . यामध्ये वेगवेगळ्या जिल्हयातील व तालुक्यातील आपल्याला आवडीप्रमाणे स्थळ समक्ष पाहता येणार आहेत.
       आतापर्यंत मराठा सोयरिक संस्थेमार्फत 3000 लग्न जमलेले आहेत.त्यापैकी साडेपाचशे लग्न हे विधवा विदुर घटस्फोटीत यांचे जमलेले आहे. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली  ही जगदंब फाउंडेशन अंतर्गत विश्वसनीय  संस्था आहे. हा ७६ वा मोफत मेळावा आहे. अधिक माहितीसाठी ७४४७७८५९१० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे, श्रीगोंदा पंचायत समिती माजी सदस्या कल्याणी लोखंडे, डी एम शिंदे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, अ. नगर जिल्हा  कृषी पतसंस्थेच्या संचालिका उज्वला शेळके, मधुकर रसाळ, सागर मोरे, बाळासाहेब भोर, नितीन घालमे, विजय लंके, अविनाश निंभोरे, प्रवीण बेलदार, प्रा. योगेश कोतकर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा