*मराठय़ांच्या शक्तींच्या वाटेला जाऊ नका आरक्षण जाहीर करा जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे*
करमाळा प्रतिनिधी/ मराठा आरक्षणासंबंधात
सरकारला दिलेली मुदत संपल्यामुळे पुन्हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषण सुरु केलेले आहे. त्या उपोषणास
वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा (प) माढा विभाग, करमाळा तालुका व शहरच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.
या संबंधी सरकारने गांभिर्याने विचार करुन शासन दरबारी कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण लागू करावे निर्णय घेऊन मराठा समाजास आरक्षण तत्काळ मंजूर करावे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या उद्रेकाला सर्व सरकार जबाबदार राहील. असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे. तालुकाध्यक्ष. जनार्दन उबाळे. शहर अध्यक्ष. गणेश कांबळे महासचिव रामभाऊ कांबळे. ता.संघटक. महावीर पोळ. उपाध्यक्ष. साधु चौथमहाल, सचिव. विश्वराज आल्हाट, लहु भालेराव. गणेश कांबळे ऋतीक लोंढे मराठा क्रांती मोर्चाचे. विजय लावंड. महादेव फंड, दत्ता फंड, सचिन गायकवाड. ता.अध्यक्ष. संतोष वारे. सावंत गटाचे नेते. सुनील सावंत मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या साखळी उपोषणस वंचित बहुजन युवा आघाडीचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. असे मत जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना सांगितले की मराठय़ांच्या खांद्याला खांदा लावून जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार मंत्री. यांना तालुक्यात व जिल्ह्यात फिरून देणार नाही. मराठा समाजा जेवढे शांत आहेत. तेव्हढी लढवैय्य आहेत. 180 आमदार मंत्री आहात समाजाबद्दल तुम्हाला ओढ असेल तर द्या राजीनामे बघू कसे आरक्षण मिळत नाही. तुम्ही लाचार झालात समाजाला वाऱ्यावर सोडून गेलात काय हरकत नाही 2024 वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास श्रद्धेय ऑड.बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण मिळून देणार त्याचा फॉर्म्युला ऑड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे तयार आहे. मराठा समाज हा आमचा भाऊ आहे. ठणकावून सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा