बेंबळे येथे मतदानावर बहिष्कार व सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर..
बेंबळे |प्रतिनिधी:-
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचे अवाहान केले आहे, त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत बेंबळे येथिल सकल मराठा समाजाच्या वतीने व बेंबळे ग्रामपंचायतीकडून
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत सर्व मतदानावर बहिष्कार व सर्व पक्षाचे राजकीय नेते व पुढारी यांना गावात येण्यास व राजकीय सभा घेण्यास बंदी करण्यात आली आहे.
बेंबळे येथिल मराठा समाज बांधव छञपती चौकात एकत्र येवून प्रवेश बंदीचा फलक लावून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच विजय पवार, उप सरपंच प्रतिनिधी गोरख अनपट, ग्रामपंचायत सदस्य संजय पवार, पोलीस पाटील बिभिषण किर्ते, समाधान भोसले, प्रा मोहन भोसले, प्रा लक्ष्मण भोसले, जयवंत भोसले, सोमनाथ हुलगे, अमर पवार, अभिजित पवार, विश्वजित भोसले, साधू पवार, बापू भोसले, संदीप कदम, अनिल शिंदे, यशवंत कदम, विकी जगदाळे, सोमनाथ नागटीळक, मयूर पवार, उदय भोसले यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा