Breaking

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

रामनाथ विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*.




*रामनाथ विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*. 



*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी* 

  श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे 2 ऑक्टोबर 2023 रोजी सोमवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व श्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयातील सहशिक्षक श्री शरण धाराशिवे व भास्कर सूर्यवंशी यांच्या हस्ते दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पी. सी पाटील यांनी दोन्ही विभूतींच्या जीवन चरित्रावरील महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना विशद करून सांगितली. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्य लिपिक श्री ईश्वर वाडकर, श्री युवराज पाटील, सहशिक्षक श्री श्याम कोकाटे, प्रयोगशाळा सहाय्यक श्री शिरीष धाराशिवे, विद्यालयातील सेवक कर्मचारी श्री अण्णासाहेब गायकवाड, दत्ता कोळी,   रमा गीर, जगन्नाथ अंबुलगे, व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा