करमाळा तालुक्यातील जेऊर सह16 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजला पाच नोव्हेंबरला होणार मतदान
जेऊर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जेऊर सह 16 ग्रामपंचायतचा अखेर बिगुल वाजला असून येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून सहा नोव्हेंबरला मतमोजणी आहे यामध्ये जेऊर सहीत केम चिकलठाण कंदर या मोठ्या ग्रामपंचायतचा समावेश आहे राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मुदत संपणाऱ्या 109 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे तर करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला रोजी मतमोजणी होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा