Breaking

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

शिवशक्ती महामार्ग मागणी कावड यात्रेचे बेंबळे येथे जंगी स्वागत...




शिवशक्ती महामार्ग मागणी कावड यात्रेचे बेंबळे येथे जंगी स्वागत...


 टेंभुर्णी  /प्रतिनिधी
:- तुळजापूरचे शक्तीपीठ व श्री क्षेत्र शिखर शिंंगणापूरचे शिवपीठ या तीर्थक्षेत्रास जोडणारा शिवशक्ती महामार्ग करा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिंदे- शिवसेनेच्या संपर्क प्रमुख  संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पायी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कावड यात्रेचे बेंबळे येथे आगमन झाल्यानंतर नागरीकांकडून जेसीबी मधून पुष्पवृष्टी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी बेंबळे ग्रामस्थांकडून सरपंच विजय पवार,उपसरपंच नमिता अनपट  गोविंद भोसले, रत्नाकर कुलकर्णी, पोपट अनपट व यशवंत भोसले यांनी संजय कोकाटे व कावड यात्रेतील शिवशक्तांचे स्वागत केले.

तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे आराध्य दैवत शंभू महादेव यांना जोडणारा हा महामार्ग होणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनदरबारी रेटा लावणे गरजेचे आहे. म्हणून जात धर्म पंत आणि पक्ष सोडून सर्वानी कावड यात्रा निघाली.


शिखर शिंगणापूर पासून लवंग ता. माळशिरस पर्यंत पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून तुळजापूर, माढा, वैराग, चिंचोली, भुताष्टे, पडसाळी भेंड वरवडे, परीतेवाडी परीते बेंबळे वाफेगाव व लवंग असा ११९ किमी अंतराचे काम बाकी आहे. दोन्ही  तीर्थ क्षेत्रे चौपदरी महामार्गाने जोडण्यात यावेत यासाठी संजय कोकाटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व  रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन दिले आहे. विशेष बाब म्हणून शिवशक्ती मार्गास मान्यता देण्याची मागणी केली आहे. 

यावेळी बेंबळे येथिल स्वागत सभेत संजय कोकाटे, दादासाहेब साठे, बाळासाहेब पाटील, प्रा. सुहास पाटील संजय घाटणेकर  यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. सदरप्रसंगी दादासाहेब साठे, प्रा सुहास पाटील, संजय पाटील घाटणेकर, बाळासाहेब पाटील, दिपक खोचरे, योगेश पाटील, राहूल कुलकर्णी, गार अकोले चे सरपंच गोविंद पवार, अशोक देवकर, नवनाथ सुरवसे, तुकाराम पाटील, श्रीपती मिटकल, नंदकुमार पाटील, यांच्यासह  बेंबळे, माळेगाव, परीते, परितेवाडी मिटकलवाडी या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कावड यात्रा यशस्वी होण्यासाठी शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. बाळासाहेब पाटील, रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील, जलतज्ज्ञ अनिल पाटील, ज्ञानेश्वर सलगर, शिवसेनेचे नेते विनोद पाटील, औदुंबर महाडीक, पंचायत समिती सदस्य डॉ. प्रदीप पाटील, पडसाळीचे सरपंच योगेश पाटील, व्हा चेअरमन सुधीर पाटील, राजाभाऊ चवरे, राहुल पाटील, नगरसेवक नितीन साठे, अजिनाथ माळी, बेंबळेचे सरपंच विजय पवार, परितेचे सरपंच हनुमंत भोसले, चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, भुताष्टेचे सरपंच सुरेश यादव, भेंडचे सरपंच संतोष दळवी, सरपंच राहुल जाधव, महेश पाटील, दीपक खोचरे, निवृत्ती तांबवे, नागेश गायकवाड, पोपट ठेंगल, महारुद्र जाधव, बालाजी मोजमुले सचिन पाटील, प्रकाश चोपडे, संतोष यादव, राजाभाऊ यादव परिश्रम घेत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा