करमाळा मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षण उपोषणाला पाठींब
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी संपूर्ण महाराष्ट्रातुन साखळी उपोषण सध्या सुरु आहे या साखळी उपोषणाला जाहिर पाठींबा म्हणुन करमाळा येथील मराठा समाज बांधवानी गेली पाच दिवसापासुन तहसील कार्यालय येथे साखळी उपोषण सुरू केले आहे त्या उपोषणाला करमाळा शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने पाठींबा देण्यात आला असुन याबाबत तहसीलदार करमाळा यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी, हाजी कलीमभई काझी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष आझाद शेख सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीन पठान पत्रकार नासीर कबीर अशपाक सय्यद आलीम शेख,ॶॅड, आलीम पठान, हाजी फारुक बेग, समीर शेख, जमील सय्यद, सुरज शेख, इम्तियाज पठान, जिशान कबीर इसाक पठाण, आयुब शेख तसेच जेऊर ग्रामपंचायत चे सदस्य मुबारक फकीर पै, समीर शेख, आलीम खान साजिद बेग जमीर सय्यद आलीम बागवान अमजद शेख मजहर नालबंद नसरुल्ला खान आदी सह करमाळा शहर तसेच तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांनी पाठींबा दिला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा