Breaking

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या १ हजार ४०० कामगारांना हेल्मेटचे वाटप..कामाच्या ठिकाणी हेल्मेट सक्तीचे.......... रणजीतसिंह शिंदे



विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या १ हजार ४०० कामगारांना हेल्मेटचे वाटप..कामाच्या ठिकाणी हेल्मेट सक्तीचे.......... रणजीतसिंह शिंदे


 बेंबळे।प्रतिनिधी।                


विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ व २ कडील सन २०२३-२४ चा गळीत हंगाम सुरु झालेला असून कारखान्यातील कामगारांना दिपावली सणाच्या मुर्हतावर सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे वाटप कारखान्याचे संचालक व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे शुभहस्ते करणेत आले.


अधिक माहिती अशी की,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ व २ कडील सन २०२३-२४ चा गळीत हंगाम सुरु असून कारखान्याचे प्रगतीमध्ये कामगार हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. कामगारांची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता महत्वाची असून हेल्मेट ही एक आवश्यकता आहे. हेल्मेट हे कामगारांना पडणाऱ्या वस्तु विजेचे धोके आणि इतर धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली व दिपावली सणाचे औचीत्य साधून युनिट नं.१ व २ कडील एकुण  १ हजार ४०० कामगारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कामाचे ठिकाणी हेल्मेट वापर सक्तीचे आहे. कामगारांना वेळोवेळी सुरक्षितते संदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येत आहे. कारखान्यामार्फत कामगारांसाठी एल.आय.सी. ग्रुप ग्रॅज्युईटी स्किम, कामगार पतसंस्था, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या पाल्यांना शालेय शिष्यवृत्ती, मयत कामगारांचे कुटुंबियांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम कारखान्याचे माध्यमातून राबविले जात आहेत. 

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक लाला मोरे,अनिल विर, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, केन मॅनेजर एस.पी. थिटे,डिस्टिलरी मॅनेजर पी.व्ही.बागल,चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे,चिफ केमिस्ट ए.के.जगताप,सुरक्षा अधिकारी जगताप हे उपस्थित होते.

फोटो.... विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब या दोन्ही युनिटच्या कामगारांना हेल्मेट वाटप करताना रणजीत भैय्या शिंदे व इतर मान्यवर.।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा