सर्वांच्या सहकार्याने टेंभुर्णी शहराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार...नूतन सरपंच सुरजा बोबडे
बेंबळे।प्रतिनिधी।
अध्यात्मिक ज्ञानाच्या नैतिक बळावर सर्वांच्या विश्वासास पात्र राहून टेंभुर्णी शहराच्या विकासाचे स्वप्न निश्चित पूर्ण करण्यात एईल असा ठाम विश्वास टेंभुर्णी शहराच्या नूतन सरपंच सुजाताई बोबडे यांनी व्यक्त केला आहे .येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्रा मध्ये दीपावली निमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी त्या आपले विचार व्यक्त करत होत्या. राजयोगिनी अनिता बेहेन, भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा बोबडे पार्टीचे प्रमुख योगेश बोबडे, सायली बेहेन नूतन ग्रामपंचायत सदस्या सुनंदात ताबे डॉक्टर पावले सौ हेमा पावले आदी प्रमुख मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या परिचयानंतर बी.के.अनिता बेहेन यांनी दिवाळी विषयी अध्यात्मिक माहिती सांगताना म्हणाल्या की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण असून सध्याच्या कलीयुगीरूपी अंधारकारातून बाहेर पडून शांत, संयमी व वैभवशाली जीवन व्यतीत करण्यासाठी राजयोगाद्वारे परमात्म्याचे ज्ञान आत्मसात करणे काळाची नितांत गरज आहे .
याप्रसंगी नूतन सरपंच सुरजा बोबडे म्हणाल्या की मला लहानपणापासून ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय आहे ,माझे माहेर व सासर दोन्हीही सात्विक व सकारात्मक विचारसरणीचे आहेत ,मला या आध्यात्मिक ज्ञानाच्या आत्मविश्वासावर टेंभुर्णी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे बळ निश्चित मिळणार आहे तसेच सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य यामुळे या सर्वांगीण विकासाभिमुख कामाची जबाबदारी निश्चित यशस्वी करून दाखवीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौ. हेमा पावले यांनी नूतन सरपंच सुरजा बोबडे व नूतन सदस्या सुनंदा ताबे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डोक्यावर ताज ठेवून, खांद्यावर चुनरी आणि शाल घालून लक्ष्मीनारायणाच्या फोटोसहीत नूतन सरपंच सुरजाताईंचा व नूतन ग्रामपंचायत सदस्य सुनंदा ताबे यांचा ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने बेहेनजींनी हृद्य सत्कार केला, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, प्रतिकात्मक स्वरूपाच्या श्री लक्ष्मी देवीची आरती करण्यात आली, लहान मुलींनी याप्रसंगी नृत्य सादर केले ,दिवाळी फराळानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
या कार्यक्रमास टेंभुर्णी, बेंबळे ,शिराळ ,पिंपळनेर शेवरे आधी ठिकाणच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा