*वकील वस्ती (पवार वस्ती) येथे मराठा आरक्षणा साठी रस्ता रोको*
टेंभुर्णी प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बावडा येथील वकील वस्ती पवार वस्ती या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला यावेळी महिलांची ही उपस्थिती होती अंतरवाली सराटी येथे मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आमरण उपोषणास बसलेले मराठा योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला या आंदोलनास सर्व समाजातील बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी शासनाचा जोरदारपणे निषेध करण्यात आला रस्त्यावरती टायर जाळून शासनाचा तीव्रपणे निषेध करण्यात आला.
सरकार मराठा आरक्षणाविषयी वेळ काढू ची भूमिका घेत असल्यामुळे सरकार विषयी प्रचंड राग व्यक्त करण्यात आला यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब श्री दिलीप पवार यांना सकल मराठा समाज यांच्या वतीने महिलांनी आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी निवेदन दिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा